मनोरंजन

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर कोसळला दुखःचा डोंगर

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनालीचे लग्नसमारंभातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्रीवर दुखःचा डोंगर कोसळला असून तिच्या कुटूंबातील सदस्याचे दुखःद निधन झाले आहे.

सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक भावूक पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही बातमी सांगितली आहे. याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची आजी सुशिला कुलकर्णी यांचे दुखःद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. रविवार (दि. २१) ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून या बातमीने सोनालीच्या कुटूंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. सोनालीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन सोनालीने आजीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सोनाली आपल्या आजीसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याचबरोबर आजीसोबतचा एक गोड फोटोही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनीही भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओसोबत सोनाली कुलकर्णीने “आजी तु आमच्यासोबत असशील, आम्ही असेपर्यंत” असा भावूक कॅप्शन दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

15 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

18 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

20 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago