मनोरंजन

सिद्धार्थ- कियारा लवकरच करणार लग्नाची घोषणा

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या एका कथित कपलची जोरदार चर्चा आहे ते म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. दोघांची वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सिद्धार्थ कॉफी विथ करणच्या 7 व्या सीझनमध्ये विक्की कौशलबरोबर मागच्याच आठवड्यात सहभागी झाला होता. करणनं तेव्हाही सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या नात्याबद्दल विचारलं होतं मात्र मी योग्य वेळेची वाट पाहतोय असं सिद्धार्थनं सांगितलं. मात्र आता सिद्धार्थ आणि कियारा या वर्षी लग्न करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

कॉफी विथ करणच्या या आठवड्याच्या भागात कबीर सिंहची हिट जोडी म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सहभागी होणार असून दोघांच्या नात्याबद्दल नवा खुलासा समोर आला आहे. दोघांची सुपरहिट जोडी काउचमध्ये मात्र दोघांच्या सिक्रेटची चांगलीच पोलखोल करताना दिसणार आहेत. आजपर्यंत सिद्धार्थ आणि कियाराच्या नात्याच्या केवळ चर्चा आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही पण शाहिदनं मात्र दोघांच्या नात्याची चांगलीच पोल खोल करत दोघेही या वर्षाच्या शेवटी त्यांच्या लग्नाची घोषणा करणार असल्याचा खुलासा केलाय.

कॉफी विथ करणचा लेटेस्ट एपिसोड प्रोमो समोर आला आहे. त्यात दाखवल्याप्रमाणे करण कियाराकडून तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. तुम्ही रिलेशनमध्ये आहात का? तुमच्यात नेमकं काय आहे? असं करणनं विचारल्यानंतर ‘आम्ही फ्रेंड आहोत? क्लोज फ्रेंड’. कियाराच्या या उत्तरावर शाहिद मात्र कियाराला इशारा करत ‘या वर्षाच्या शेवटी एक मोठी घोषणा होणार आहे त्यासाठी तयार राहा आणि हो ही घोषणा काही सिनेमाशी निगडीत नसणार आहे’.

शाहिदच्या या कमेंटनंतर करण देखील शॉक झाला. तसंच कियारा आणि सिद्धार्थच्या फॅन्सनं देखील एक्साइटमेंट दाखवली आहे. आता या आठवड्याच्या भागात कियारा काय काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सिद्धार्थ आणि कियारानं ‘शेरशाह’ या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केलं. दोघांची अनोखी केमिस्ट्री सिनेमात पाहायला मिळाली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

15 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

18 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

20 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago