मुंबई: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते, तर गावाकडे तिचा क्रेझ खासच आहे. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात.
सध्या गौतमी लावणी डान्ससोबतच विविध म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसत आहे. नुकताच तिचा ‘गच्चीवरुन कशी दिसते’ या गाण्याचा रिमेक समोर आला आहे. परंतु, गौतमीने आयुष्यात पहिला डान्स कोणत्या गाण्यावर केला, हे थोड्याच लोकांना माहिती आहे.
धुळ्यातील शिंदखेडा गावात तिने बालपण घालवले. तिचे वडील चोपडा गावाचे होते, परंतु लहानपणापासून तिला त्यांचा सहवास कधीच मिळालेला नाही. गौतमी दोन मामा, मावशी आणि आईचे आजोबांसोबत वाढली. तिची आई, गौतमी आणि आजोबा यांचा एकत्रित कुटुंब गावात राहत असे. दहावीपर्यंतचं शिक्षण तिने गावातच पूर्ण केलं.
गौतमीने एका मुलाखतीत सांगितले, “शाळेत असताना मला अभ्यासात रस नव्हता, पण लहानपणापासूनच डान्सची आवड होती. शाळेत असताना मी पहिला डान्स ‘चला जेजुरीला जाऊ’ या गाण्यावर केला.”
आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित असतानाही पुण्यात आल्यानंतर तिच्या आईच्या मैत्रिणीच्या मदतीने तिला लावणी शिकवणाऱ्या शिक्षकांची भेट मिळाली. गौतमीने स्वतः पैसे गोळा करून घुंगरु आणले आणि प्रॅक्टिस सुरू केली.
आयुष्यातील पहिला सार्वजनिक स्टेज डान्स अकलूज लावणी महोत्सवमध्ये झाला. त्या कार्यक्रमात ती बॅक डान्सर म्हणून सहभागी झाली आणि त्यांच्या ग्रुपला पहिला क्रमांक मिळाला. या यशानंतरच तिला या क्षेत्रात स्थान मिळाले आणि आज ती चाहत्यांच्या मनात एक वेगळा आदर्श बनली आहे.गौतमी पाटीलचा हा प्रवास हे दाखवतो की आवड आणि मेहनत असल्यास कोणतीही अडचण मात करता येते आणि स्वप्नांना पंख मिळवता येतात.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…