आरोग्य

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे. सततचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याची वेळ यांसारख्या गोष्टींमुळे ताण आणि चिंता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

तुम्हालाही सतत ताण येतो का? डोक्यात एकाच गोष्टींचे विचार येतात? चिंता केल्याने त्रास होतो का? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या मानिसक आरोग्याच्या समस्या अधिक वाढू शकता.

फळं खाल्ल्यानंतर लगेच पिऊ नका पाणी, होतील उलट्या-वाढेल मळमळ, उन्हाळ्यात ‘ही’ घ्या काळजी

1) ताण- चिंतेचा धोका 

तणाव येणं किंवा चिंता वाढणं याची अनेक कारणे येऊ शकतात. यामुळे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरचे संतुलन बिघडल्यामुळे आपला ताण वाढतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा देखील आपल्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे चिंता करणे वाढते. डॉक्टरांच्या मते अशावेळी आपण नकारात्मकतेकडे जाण्यापेक्षा संवाद साधणं महत्त्वाचं आहे.

2) कॅफिनचे अतिप्रमाणात सेवन 

आपण जर चहा आणि कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करत असू तर ते आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. जास्त प्रमाणात कॅफिन प्यायल्याने चिंतेच्या समस्येत भर पडते. तज्ज्ञांच्या मते कॅफिनच्या सेवनामुळे मज्जासंस्था उत्तेजित होतात. याशिवाय कॅफिनमुळे हृदयाची गती आणि रक्तदाब देखील वाढतो. ज्यामुळे चिंतेच्या लक्षणात वाढ होते. म्हणून कॅफिनचे कमी प्रमाणात सेवन करायला हवे.

3) सतत नकारात्मक विचार 

नकारात्मक विचार हे देखील तणाव वाढण्याचे प्रमुख कारण आहे. नकारात्मकतेमुळे आपण स्वत:वर शंका घेऊ लागतो. काही गोष्टींकडे आपण सकारात्मक भावनेने पाहायला हवे. तसेच पुरेशी झोप न मिळाल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे ताण आणि चिंता वाढू शकते. जीवनशैलीत काही बदल केल्यास या समस्या टाळता येतात.

4) तणाव आणि चिंता टाळण्यासाठी

पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यासाठी आपण जंकफूडचे सेवन कमी करायला हवे. आहारात पौष्टिक पदार्थ खा. नियमित व्यायाम, योगा न केल्याने ताण आणि चिंता वाढू शकते. यासाठी किमान ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. ध्यान करणे, मोठ्याने श्वास घ्या. ज्यामुळे मन शांत होऊ शकते. चिंता कमी होऊ शकते. कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. याचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने चिंतेच्या लक्षणात वाढ होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…

1 तास ago

थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

1 तास ago

सात दशकांच्या अभिनय प्रवासातील आठवणींना उजाळा; ‘चित्रपताका’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंच्या गप्पांनी रंगली मैफल!

‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद,…

1 तास ago

दुष्काळात पशुधनाला चाऱ्याचा आधार! ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत चारा लागवडीला प्रोत्साहन

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी निर्माण होणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…

1 तास ago

वोटचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला घुमजाव करावे लागले

राहुल गांधींच्या आंदोलनाचा परिणाम; आशिष शेलारांनी आधी माहिती घ्यावी, ॲड. संदेश कोंडविलकरांचा पलटवार मुंबई: लोकसभेतील…

1 तास ago

मराठी सिनेमाची ५०० कोटींच्या व्यवसायाची क्षमता; ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करा

प्रवीण तरडे यांचा ‘चित्रपताका’तील परिसंवादात विश्वास; मराठी चित्रपटांच्या मार्केटिंग, निर्मिती आणि प्रेक्षकांशी तुटलेल्या नात्यावर मंथन…

2 तास ago