आरोग्य

घरच्या घरी ब्लड प्रेशर कसे तपासावे

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. रक्तदाब हा असा दीर्घकालीन आजार आहे, ज्यासाठी वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित रक्तदाब तपासणे गरजेचे आहे. रक्तदाब कमी होणे किंवा वाढणे दोन्हीही आरोग्यासाठी धोकादायक आहे.

सध्या दिवसेंदिवस रक्तदाबाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येकडे दीर्घ काळासाठी दुर्लक्ष केले तर ह्रदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब कंट्रोल ठेवण्यासाठी रक्तदाब दिवसातून दोनदा तपासणे खूप गरजेचे आहे. दिवसातून दोनदा रक्तदाब चेक करण्यासाठी डॉक्टरकडे जाणे अवघड वाटत असेल तर तुम्ही घरीच रक्तदाब चेक करू शकता. पण, तुम्हाला घरी रक्तदाब कसे तपासायचे माहितीये का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

लोकांना रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत माहीत नाही, ज्यामुळे चुकीची रीडिंग येते, जे आरोग्यास घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, चुकीची बैठी जीवनशैली किंवा लघवी थांबवून ठेवणे यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे रीडिंग बदलू शकते. तज्ज्ञांनी सांगितल्या प्रमाणे घरात रक्तदाब कसा तपासावा?

घरच्या घरी रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत

१) सर्वात आधी रक्तदाब तपासण्यापूर्वी नेहमी मूत्राशय खाली करा. लघवी करून आल्यानंतर बीपी चेक करावा, तेव्हाच योग्य रीडिंग येईल.

२) रक्तदाब तपासण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसावे आणि आराम करावा.

३) रक्तदाब तपासण्यासाठी अशा खुर्चीचा वापर करा, ज्यामध्ये पाठीला आराम मिळेल आणि तुमचे दोन्ही पाय जमिनीवर सरळ स्थिर राहतील.

४) रक्तदाब तपासताना पायांना क्रॉस करू नका.

५) रक्तदाब तपासताना आपल्या हातापासून खांद्यापर्यंतचा भाग सरळ असावा. तुम्ही हाताला उशीचा आधार देऊन ठेवू शकता.

६) रक्तदाब तपासण्याचा स्फिग्मोमॅनोमीटर (कफ) योग्य आकाराचा असणे आवश्यक आहे आणि या कफला योग्य प्रकारे हाताला बांधले पाहिजे.

७) रक्तदाब तपासताना घाबरू नये. कोणताही ताण तणाव घेऊ नये आणि निवांत राहण्याचा प्रयत्न करावा.

८) रक्तदाब तपासण्यापूर्वी ३० मिनिटांपर्यंत बोलू नये, कॉफी पिऊ नये आणि धूम्रपान करू नये.

९) एकाच वेळी दोनदा रक्तदाब तपासावे आणि मध्ये एक मिनिटाचे अंतर ठेवावे. त्यानंतर दोन्ही वेळचे सरासरी काढावे. दररोज एकाच ठराविक वेळेला रक्तदाब तपासणी केली तर अधिक चांगले.

१०) घट्ट कपडे परिधान करू नये.

नियमित वेळेला रक्तदाब तपासल्याने व्यक्तीला आरोग्याविषयी जागरुक राहण्यास प्रेरणा मिळते. यामुळे व्यायाम, संतुलित आहार आणि तणाव नियंत्रित ठेवणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जलद गतीच्या व्यायामांमुळे रक्तातील साखर वाढू शकते?

चालणे, योगासन करणे आणि जास्त हालचालींचे बहुतेक प्रकार शरीराला ग्लुकोजचे चांगले नियमन करण्यास मदत करतात.…

26 मिनिटे ago

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…

14 तास ago

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…

14 तास ago

थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

14 तास ago

सात दशकांच्या अभिनय प्रवासातील आठवणींना उजाळा; ‘चित्रपताका’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंच्या गप्पांनी रंगली मैफल!

‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद,…

14 तास ago

दुष्काळात पशुधनाला चाऱ्याचा आधार! ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत चारा लागवडीला प्रोत्साहन

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी निर्माण होणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…

14 तास ago