मनोरंजन

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचं लग्न?

मालदीव: आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर फरार झालेले ललित मोदी यांनी माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्याशी लग्न केले आहे, याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून पुढे आले आहे.

सुष्मिता सेन (वय ४६) रिलेशनशीपमध्ये होती, मात्र तिने आत्तापर्यंत स्वताला लग्नाच्या बंधनात अडकून घेतले नव्हते. तीन वेळा रिलेशनशीपमध्ये असूनही सुष्मिता सेन लग्नाच्या निर्णायपर्यंत पोहचली नव्हती. आम्ही सध्या डेट करतोय एवढीच माहिती सुष्मिता सेन हीच्याकडून देण्यात आली आहे. सर्वात आधी ललित मोदी यांनी पहिले ट्विट केले. त्यावेळी लग्न केल्या अशाच बातम्या आल्या. मात्र काही वेळातच त्यांनी स्पष्टीकारणही दिले.

सुष्मिता ही एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री राहिली आहे. काही दिवसांपासूर्वीच सुष्मिताचे रोहमनसोबत ब्रेकअप झाले होते. सुष्मिता आणि रोहमन 2018 सालापासून एकमेकांना डेट करू लागले होते. दोघेही एकमेकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक आधार देत असत. रोहमन सुष्मिताच्या मुली आणि तिच्या कुटुंबाच्याही खूप जवळचा होता. तो हिच्यापेक्षा वयाने लहान होता दोघांमध्ये 15 वर्षांचे अंतर होते.

दरम्यान, ललित मोदी यांनी देशात आयपीएलची सुरुवात केली होती. 2008 साली आय़पीएल आल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 2005 ते 2010 त्यांच्याकडे बीसीसीआयच्या अपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. 2008 ते 2010 या काळात त्यांच्याकडे आयपीएलचा कार्यभार होता. ते आयपीएलचे अध्यक्ष आणि कमिश्नर होते. 2010 साली घोटाळ्याच्या आरोपावरुन त्यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यांना बीसीसीआयने सस्पेंडही केले. पैशांच्या अफरातफरीच्या आरोपानंतर 2010 साली ललित मोदी देशातून फरार झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

13 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

16 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

18 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago