मनोरंजन

जेलमधून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा मोठ्या पडद्यावर

मुंबई: चेक बाऊंस प्रकरणामुळे तुरुंगात गेलेले विनोदी अभिनेता राजपाल यादव काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आले आहेत. जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून, त्यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुप्रतिक्षित भूत बांगला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 1 मिनिट 23 सेकंदांच्या या हॉरर-कॉमेडी टीझरमध्ये अक्षय कुमार, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगची झलक पाहायला मिळते. चित्रपटात तब्बू, वामिका गब्बी, जिसू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते असरानी देखील या चित्रपटात दिसणार असून हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

टीझरची सुरुवात एका भयावह रात्रीने होते. बॅकग्राऊंडमध्ये असरानी यांचा आवाज ऐकू येतो. त्यानंतर अक्षय कुमार, परेश रावल आणि राजपाल यादव यांचे त्रिकूट एका गूढ घटनेचा शोध घेताना दिसते. अक्षय कुमार राजपाल यादवला थप्पड मारतानाचा प्रसंग आणि तिघांमधील संवाद प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

टीझरमध्ये हे तिघे एका जुन्या महालात प्रवेश करताना दाखवले आहेत. या महालाची झलक पाहून 2007 मधील सुपरहिट चित्रपट भूल भुलैया ची आठवण येते. त्यानंतर तब्बू आणि वामिका गब्बी यांच्या एन्ट्रीने कथेला आणखी रहस्याची जोड मिळते.

विशेष म्हणजे दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत. त्यांच्या जोडीने याआधी अनेक हिट कॉमेडी चित्रपट दिले असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.भूत बांगला हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला तो 19 मार्चला रिलीज होणार होता, मात्र धुरंधर 2 मुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

5 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

5 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

20 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago