मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. सिद्धटेकहून शिक्षणासाठी मुंबईत आलेली कमळी प्रत्येक वेळी नव्या वळणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी कामिनीने सरोज आणि कमळीच्या वयाच्या एका मुलीचा अपघात घडवून आणला होता. त्या अपघातात सरोज बचावली, मात्र त्या मुलीचा मृत्यू झाला. ज्या मोठ्या नातीची अनेक वर्षे वाट पाहिली, तिच्या निधनाची बातमी ऐकताच अन्नपूर्णा आजींना जबर धक्का बसला आणि त्या आजारी पडल्या. त्यातून त्यांना सावरण्यासाठी राजनने कमळीला मोठी नात म्हणून महाजन कुटुंबात राहण्याची विनंती केली. अन्नपूर्णा आजींसाठी कमळीने हे नाटक मान्य केले.
सध्या कमळी महाजन कुटुंबात राहून आजी-आजोबांची काळजी घेत आहे. त्याचबरोबर घरात सतत वाद निर्माण करणाऱ्या अनिकालाही ती योग्य शब्दांत सुनावताना दिसते. कामिनीला सडेतोड उत्तर देत कमळीने आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.
नवीन प्रोमोमध्ये काय खास?
मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये राजन आणि कमळी निंगीला महाजनांच्या घरी घेऊन येतात. निंगी शिक्षणासाठी तिथे राहणार असल्याचे कमळी स्पष्ट करते. मात्र कामिनी संतापून म्हणते, “या मुलींना लाज नाहीयेत. शिक्षण फुकटात पाहिजे आणि दिवसभराचं खाणं पाहिजे म्हणून हे घर पाहिजे.”
यानंतर अनिका निंगीला तिचं आडनाव विचारते. ती “घोरपडे” असे उत्तर देते. त्यावर कामिनी ठामपणे म्हणते, “इथे फक्त महाजन राहतात.”
मात्र पुढच्या क्षणी दृश्य पलटते. कामिनीचे सामान घराबाहेर ठेवलेले दिसते. ती संतापून विचारते, “कोणाला विचारून माझं सामान बाहेर काढलं?” त्यावर कमळी अनिकाला आजींचं आडनाव विचारते. अनिका ‘महाजन’ म्हणते, पण आजींचं मूळ आडनाव वेगळं असल्याचं लक्षात येताच ती थबकते. त्यावर कमळी कामिनीला थेट सुनावते, “मग या कामिनी आजीचं इथे काय काम? कामिनी आजी, निघा!”
नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रोमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कमळीचं कौतुक होत आहे. “कमळी अगदी बरोबर करत आहे”, “कडक कमळी”, “एक नंबर प्रोमो”, “उत्तम मालिका” अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे.आता कामिनी खरोखरच घराबाहेर जाणार का? महाजन कुटुंबात पुढे कोणते नवे वाद उभे राहणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…