मुंबई: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर अखेर विवाहबंधनात अडकली आहे. १४ फेब्रुवारी २०२६ या खास व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अपूर्वाने तनुज गोवलकरसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
मराठीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले मधील ‘शेवंता’ या भूमिकेमुळे अपूर्वा प्रचंड चर्चेत आली होती. तिच्या सरळस्पष्ट स्वभावामुळे आणि दमदार अभिनयामुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली. त्यानंतर बिग बॉस मराठी मध्ये उपविजेती ठरत तिने स्वतःचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला.
अपूर्वाची भावनिक पोस्ट
लग्नानंतर अपूर्वाने इन्स्टाग्रामवर लिहिले
“१४ फेब्रुवारी २०२६ — एक अशी तारीख जी कायमची आमची झाली. प्रेम, विश्वास आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आशीर्वादात आम्ही आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे.
आता मी ‘श्रीमती अपूर्वा तनुज गोवलकर’ आहे.
आयुष्याने अनेक परीक्षा घेतल्या, पण प्रेमावरचा विश्वास कधी ढळू दिला नाही. वादळांनंतर देवाने मला शांती आणि सहवास दिला. ही आमची दुसरी सुरुवात आहे — परिपक्वतेने, समजूतदारपणाने आणि आदराने.”तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आधीच दिली होती प्रेमाची चाहूल
जन्माष्टमीच्या वेळी अपूर्वाने तनुजसोबत खास फोटोशूट शेअर केले होते. त्यावेळीच त्यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे प्रेमाची गोष्ट मालिकेतील अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने त्या फोटोवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या होत्या.
अपूर्वाचा अभिनय प्रवास
अपूर्वाने ‘आभास’ मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. मात्र रात्रीस खेळ चाले मधील शेवंता या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर प्रेमाची गोष्ट मध्ये सावनीची भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. सध्या ती शुभ विवाह या मालिकेत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.
अपूर्वाच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी तिच्या चाहत्यांकडून आणि मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 💐✨
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…