मनोरंजन

या भारतीय महिला क्रिकेटरला अर्जुनने गुडघ्यावर बसून केल प्रपोज…

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये टी 20 मालिका खेळत आहे. सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असणारी महिला संघाची स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्ती सध्या निसर्गाच्या सानिध्यात आहे. वेदा एका वेगळ्या कारणाने सध्या चर्चेत आली आहे. वेदा कृष्णमूर्तीने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. वेदाने साखरपुडा केल्याची माहिती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन याची माहिती दिली.

वेदा कृष्णमूर्तिला अर्जुनने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज

वेदा कृष्णमूर्तिने कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होएसलाशी साखरपुडा केल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे. कर्नाटकचा रणजीपटू अर्जुन होएसलाने वेदा कृष्णमूर्तीला सुंदर अशा हिल स्टेशनवर प्रपोज केले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्जुनने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. अर्जुनच्या या प्रपोजला वेदा कृष्णमूर्तिने ग्रीन सिंग्नल दिला आहे. मग दोघांनीही एकमेकांना अंगठी घातली आणि मिठी मारली.

अर्जुनने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ज्यावेळी त्याने वेदासमाेर हा प्रस्ताव मांडला त्यावेळी वेदाचा यावर विश्वासच बसेना. याचे फोटो अर्जुनने इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केले असून ते सध्या व्हायरल होत आहेत. सध्या हे सोशल मीडियावर या दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून त्याच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

प्रपोज केल्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि त्या एकत्र क्षणाचे फोटो काढले आहेत. महिला संघातील इतर सहकारी खेळाडूंनी वेदा कृष्णमूर्तीच्या आयुष्याच्या या नव्या टप्प्यासाठी अभिनंदन केले. सोशल मिडीयावरील हे फोटो पाहून दोघांच्याही चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

वेदा कृष्णमूर्ती हिने भारतासाठी ४८ एकदिवसीय सामने खेळले असून तिच्या नावावर ८२९ धावा आहेत. तर ७६ टी-२० सामन्यांमध्ये तिने ८७५ धावा केल्या आहेत. मात्र ती सध्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर आहे. ती कॉमनवेल्थ गेम्स आणि टी-२० वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करतानाही दिसली होती. अर्जुनबद्दल बोलायचे तर डिसेंबर २०१६ मध्ये त्याने कर्नाटकच्या रणजी संघातून पदार्पण केले होते. कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये त्याने १० सामने खेळले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ३३ शाळांचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या परीक्षेत ऑनलाईन निकाल…

1 दिवस ago

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु…

1 दिवस ago

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

2 दिवस ago

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

3 दिवस ago

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण…

3 दिवस ago