मनोरंजन

Video: गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली अन्…

सांगली: नृत्यांगणा गौतमी पाटील स्टेजवर नाचता-नाचता पाय घसरून पडली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच डान्समुळे चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील हिचे अनेकजण चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. गौतमी ही दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. तिला पाहण्यालाठी लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती. त्यानंतर गौतमी पुन्हा एदा एका कार्यक्रमात दिसली. मात्र, यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण तिचा डान्स नाही. कारण, कार्यक्रमात गौतमी डान्स करताना पडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरली आहे.

गौतमीनं सांगली जिल्ह्यातील एका दहीहंडी स्पर्धेत हजेरी लावली होती. गौतमी स्टेजवर नाचत असताना अचानक स्टेजवर पडली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमी पडल्यानंतर लगेच तिचे बाऊंसर आले आणि त्यांनी लगेच तिला उचलले. मात्र, त्यानंतर देखील गौतमी हिने तिचा डान्स थांबवला नाही. गौतमी उभी राहिली आणि पुन्हा नाचू लागली.

दरम्यान, या आधी गौतमी सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. गौतमीने दहीहंडीच्या निमित्ताने डान्स केल्यानंतर तिला ट्रोल करण्याचे कारण हे वडिलांचे निधन होते. गौतमीला ट्रोल करत नेटकऱ्यांनी ‘चार दिवस झाले नाही बाप मेला… आणि या ताई साहेब नाचायला लागल्या… त्याच दिवशी कॉमेंटमध्ये मी भविष्यवाणी केली होती… आज जरी हीचा बाप मेला तरी पण हिने एखाद्या दही हंडीची सुपारी घेतलेली असेल… आणि बघा…’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी करत तिला ट्रोल केले.

Video : गौतमी पाटील हिने बैलासमोर धरला ठेका; कारण…

Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago