mahaganpati
रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी आज (रविवार) संकष्टी निमित्त अलोट गर्दी केली होती.
संकष्टी निमित्त आज पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने रांजणगावला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. येथील मंदिर प्रांगणात तसेच आज संकष्टी चतुर्थीनिमित्त सकाळी ६.३० वाजता देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात महिलासह भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते. अथर्वशीर्ष कार्यक्रम झाल्यानंतर देवस्थान ट्रस्ट चे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
राज्यात सध्या सुरु असलेली उन्हाळी सुट्टी, आज रविवार व त्यातच संकष्टी चतुर्थी असा तिहेरी योग असल्याने श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी तसेच उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे भाविकांसाठी सावलीची सोय व मॅटची व्यवस्था करण्यात आली होती. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर यांनी दिली.
संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. येथील प्रगतशील शेतकरी तथा गणेशभक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दुपारी रांजणगाव येथील श्री महागणपती भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर यांसह देवस्थानचे कर्मचारी, पुजारी उपस्थित होते.
दरम्यान, संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
महागणपती मुक्तद्वार दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा: स्वाती पाचुंदकर
संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…