मुंबई: छोटया पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचे सहावे पर्व सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक आठवड्यात नवे ट्विस्ट आणि नवे वाद समोर येत असताना यंदाच्या सिझनमधील सर्वात लहान वयाचा स्पर्धक प्रभू शेळके उर्फ ‘छोटा डॉन’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
घरातील सगळ्यात लहान सदस्य असला तरी प्रभूची निरीक्षणशक्ती मात्र कमालीची तीक्ष्ण आहे. घरातील घडामोडींवर त्याची बारकाईने नजर असते, आणि याच गुणामुळे तो वारंवार चर्चेत येतो आहे.
महिला सदस्याचे ‘गुपित’ उघड?
आगामी भागाच्या प्रोमोमध्ये प्रभू शेळके घरातील एका महिला सदस्याबाबत मोठा दावा करताना दिसतो. तो कॅप्टन तन्वी कोलतेसोबत बोलताना सांगतो की, तो अशा खुर्चीवर बसला होता जिथून तो कोणाला दिसत नव्हता. त्या वेळी संबंधित महिला सदस्याने इकडे-तिकडे पाहत माइक काढून मेकअपच्या पिशवीत ठेवला असल्याचा दावा प्रभू करतो.
“आतमध्ये एवढी छोटी पिशवी… रात्री ती काहीतरी करणार आहे!” असा संशयही प्रभू व्यक्त करतो. त्यानंतर तो म्हणतो, “एकदा कॅप्टन झाली. परत आली. माझं डोकं फिरलंय, बेकार!” — या वक्तव्यामुळे घरात नेमकं काय घडणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला
सध्या घराची कॅप्टन तन्वी कोलते असल्याने प्रभू नेमकं कोणाबद्दल बोलतोय, हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. प्रभूने पाहिलेलं नेमकं काय? आणि ती महिला सदस्य रात्री काय करणार आहे? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागातच मिळणार आहेत.
या घटनेमुळे घरातील वातावरण अधिक तापलं असून ‘छोटा डॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभूच्या भूमिकेला आणखी एक नवा आयाम मिळाला आहे. आता पुढील एपिसोडमध्ये या प्रकरणाचा काय उलगडा होतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…