महाराष्ट्र

पौडमध्ये ११ लाखांच्या कुस्तीत राडा; समर्थकाने आखाड्यात घुसून हात उचलला, सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया

पुणे: महाराष्ट्राचा प्रसिद्ध मल्ल आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला सिकंदर शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत ११ लाख रुपयांची प्रमुख कुस्ती रंगली होती. या लढतीत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे आमनेसामने आले होते. मात्र, सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दीड तास रंगली तगडी झुंज

१७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही मल्लांमध्ये जवळपास दीड तास चुरशीची झुंज पाहायला मिळाली. कुस्ती सुटत नसल्याने दोघेही दमलेले दिसत होते. दरम्यान, सामन्यात माऊली कोकाटे यांनी सिकंदरला कानठाळी दिल्याचा प्रकार घडला. त्यावर सिकंदरने त्यांना ताकीद दिली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा कानठाळी दिल्याने दोघांमध्ये वादावादी सुरू झाली.

समर्थकाचा आखाड्यात प्रवेश; सामना थांबवला

वाद वाढत असतानाच कोकाटे यांचा एक समर्थक थेट आखाड्यात उतरला आणि सिकंदरवर हात उचलल्याचा प्रकार घडला. यामुळे वातावरण तापले. पंचांनी तात्काळ हस्तक्षेप करत सामना काही काळ थांबवला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला; मात्र अखेर निकाल न लागल्याने दोन्ही मल्लांना विजयी घोषित करण्यात आले.

“आमची बॉडी गरम होती” – सिकंदर शेख

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सिकंदर शेख यांनी सौम्य भूमिका घेतली. “आमच्यात जे झालं ते रागारागात झालं. आम्ही कुस्तीत होतो, आमची बॉडी गरम होती. मला कुणालाही बदनाम करायचं नाही. कोकाटेसोबत एक मुलगा होता, तो माझ्यावर धावून आला. बाहेरून रिंगमध्ये येऊन मारणं चुकीचं आहे; पण हा फार मोठा विषय नाही,” असे सिकंदर यांनी स्पष्ट केले.

मल्ल म्हणून सन्मान कायम

शांत स्वभाव आणि उत्कृष्ट तंत्रासाठी ओळखले जाणारे सिकंदर शेख यांनी यावेळीही माऊली कोकाटे यांचा मल्ल म्हणून सन्मान राखल्याचे दिसून आले. मात्र, बाहेरून समर्थकांनी आखाड्यात घुसून हस्तक्षेप करणे ही गंभीर बाब असल्याची चर्चा कुस्तीप्रेमींमध्ये रंगली आहे.महाशिवरात्रीच्या निमित्ताने रंगलेल्या या ११ लाखांच्या कुस्तीपेक्षा सामन्यातील वाद अधिक चर्चेत राहिल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago