मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल २०२६ पासून ही वाढ लागू होणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
गाव पातळीवर, विशेषतः आदिवासी, दुर्गम व डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात अंशकालीन स्त्री परिचरांची भूमिका महत्त्वाची आहे. विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे कामही त्या प्रभावीपणे पार पाडतात.
२०१९ च्या शासन निर्णयानुसार या परिचरांना दरमहा ३ हजार रुपये मानधन दिले जात होते. मात्र, कामाचे वाढते स्वरूप, आरोग्य सेवेत वाढलेली जबाबदारी आणि महागाईचा विचार करता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेत त्यांच्या मानधनात ३ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यांना एकूण ६ हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करताना सर्व जिल्हा परिषदांनी प्रचलित कार्यपद्धतीनुसार सुधारित मानधन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक महिन्याच्या दहाव्या तारखेपर्यंत मानधन अदा करण्याचेही आदेश आहेत.या निर्णयामुळे राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…