मनोरंजन

तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत: प्रकाश कब्रे

तळेरे: निकेतचे हे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा नुकतीच पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उदगार सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी तळेरे येथे काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी भेट देऊन 15 वर्षांच्या वाटचालीबाबत कौतुक केले. त्यावेळी ते बोलत होते.

चित्रकार प्रकाश कब्रे हे शिरोडा येथील असून त्यांच्या चित्रांची अनेक ठिकाणी प्रदर्शने झालेली आहेत. या भेटीदरम्यान कब्रे यांनी ‘अक्षरोत्सव’ मध्ये असलेल्या सर्व संदेश पत्रांची पाहणी केली. अनेकांसोबतच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी बोलताना कब्रे म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी खरच आनंदाचा दिवस आहे. गेले किती दिवस अक्षरघराला भेट देण्याची इच्छा होती. ती नुकतीच पूर्ण झाली. अक्षरघर या संकल्पनाही भन्नाट असल्याचे म्हणाले. यापूर्वी अनेकांनी या अक्षरघराला भेट देऊन या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे कौतुक केले आहे.

यावेळी चित्रकार प्रकाश कब्रे यांनी निकेत पावसकर यांच्या वाटचालीला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अलीकडे निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला निशुल्क स्पर्धा परिक्षा व्याख्याते, मुंबई सिमाशुल्क विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर, लालबाग येथील आनंदभूवन चे मेघनाथ शेट्टी, लेखक महेश काणेकर, बाल साहित्यिक बाबुराव शिरसाट, लोकसत्ताचे वरिष्ठ क्रिडा प्रतिनिधी प्रशांत केणी आदिंनी भेट देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत.

भारतीय पोस्ट कार्डवरच संदेश का? 

या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. तसेच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने आणि आपली काहितरी वेगळी खासियत असावी यासाठी संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जातात.

अक्षरघराला यांनी दिली भेट

तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे, पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात

निकेतच्या या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे. याशिवाय या अनोख्या संग्रहाबद्दल निकेत पावसकर यांची सह्याद्री वाहिनीसह सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरही मुलाखतही प्रसारित झाली आहे. प्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला भेट देऊन त्यांच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago