मुंबई: वंचित बहुजन आघाडी व MIM पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार (दि.5) सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेस पक्षच सर्व समाज घटकांना न्याय देऊ शकतो याचा विश्वास असल्यानेच नुकताच एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करा व पक्ष संघटन बळकट करा, असे आवाहन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षाचे स्वागत केले.
काँग्रेसमध्ये प्रदेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये, वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शाकीर इंसालाल तांबोळी, सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव उमर फारुक काकमरी, सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष फारुक अब्दुलरहमान पटणी, एमआयएमचे इस्लामपूर (जि सांगली) शहराध्यक्ष एजाज मुजावर, एमआयएमचे इस्लामपूर तालुकाध्यक्ष जाकिर मुजावर, वंचित बहुजन आघाडीचे नौशाद तांबोळी, मौला नदाफ, दिलावर तांबोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…