मनोरंजन

अभिनेते रविंद्र महाजनी यांचा घरातील शेवटचा भयंकर फोटो समोर…

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. एका सुपरस्टारचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हे दुर्देवं आहे.

रवीद्र महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे. त्यांच्या मृतदेह जमिनीवर पडलेला होता. दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने शरीर, चेहरा काळा पडला होता. त्यांनी पिवळ्या रंगाचं टिशर्ट घातलं होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी प्रोटीन पावडरचा डबा दिसत आहे. रविंद्र महाजनी बेडच्या खाली, डोक्यावर पडले आहेत. याशिवाय शेजारी काळ्या रंगाचं ऑइलही दिसत आहे. नेमकं त्यांच्या शेजारी असलेल्या काळ्या रंगाचं द्रव्य काय आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र चेहरा अत्यंत काळा पडला आहे. बेडशेजारी काही शूजही दिसत आहेत.

एका मुलाखतीत गश्मीरने सांगितले की, ‘वयाच्या 15व्या वर्षी पुण्यात स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. त्यावेळेस आम्ही आर्थिक संकटात होतो. आमचं घर बँकेत गहाण होतं. 40-50 लाखांचं कर्ज होतं. डान्स अकॅडमीनंतर 2 वर्षांनी स्वत:ची कार्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली. त्यातून पॅन इंडिया इव्हेंट्स करायचो. 21 व्या वर्षी 5-6 वर्षात आम्ही 40-50 लाखांचं कर्ज फेडले. आमचं घर सोडवलं. 17 व्या वर्षी मी इनकम टॅक्स फाइल करायचो.’

गश्मीरचं त्याच्या आईबरोबर फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गश्मीरची आई त्याच्याबरोबर मुंबईत राहते. तर रवींद्र महाजनी मागील 8-9 महिन्यांपासून तळेगाव येथे भाड्याच्या घरात राहात होते. गश्मीर महाजनी सोशल मीडियावर सक्रीय असतो. अनेक रिअलिटी शोमध्ये काम करत असतो. तिथे प्रत्येक वेळी त्याची आई त्याच्याबरोबर असते. सोशल मीडियावरही गश्मीर आईबरोबरचे फोटो शेअर करतो. वडिलांचा कोणताही उल्लेख त्याच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत नाही. वडिलांपेक्षा आईबरोबर गश्मीरचा चांगला बॉन्ड आहे. रविंद्र महाजनी पुण्यात एकटे राहत असल्याचं समोर आलं आहे. तर गश्मिर आई आणि पत्नी-मुलासोबत मुंबईत राहतो.

रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 1975 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मराठीतील विनोद खन्ना म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे चित्रपट विशेष गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले आहे. त्यांनी 1997 साली प्रदर्शित झालेल्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तसेच, या चित्रपटाची निर्मीतीही त्यांनीच केली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

32 मिनिटे ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

17 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

21 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

21 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

21 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

21 तास ago