आरोग्य

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने वापरलेल्या सुईने घेतलेले इंजेक्शन याद्वारे पसरतो. इतकेच नाही, तर आईकडून तिच्या नवजात बाळातही हा पसरतो. हेपेटायटिस विषाणू थेट यकृतावर हल्ला करतो. त्यामुळे यकृताला सूज येते, म्हणूनच या आजाराला हेपेटायटिस असे नाव देण्यात आले आहे.

हेपेटायटिसचे प्रकार

हेपेटायटिसचे सहा प्रकार आहेत. ए, बी, सी, डी, ई आणि जी. यातील ए आणि बी हे जास्त आढळून येतात. ए आणि ई हे जास्त धोकादायक नाहीत; मात्र बी आणि सी हे खूप धोकादायक आहेत आणि त्यांना क्रॉनिक हेपेटायटिस म्हणजे दीर्घकाळ राहणारे हेपेटायटिस म्हणून ओळखले जाते. डी हा प्रकार बी बरोबर अ‍ॅक्टीव्ह असतो. हेपेटायटिस ए आणि बी साठी लस आहे; पण सी साठी नाही आणि हेपेटायटिस ई आणि जी अत्यंत विरळा आहेत.

हेपेटायटिसची लक्षणे

सांधेदुखी, पोटात दुखणे, उलट्या होणे, अशक्तपणा येणे, सतत थकल्या सारखे वाटणे, ताप येणे आणि लघवीचा रंग गडद होणे, भूक न लागणे, त्वचा पिवळी पडणे, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे आणि लघवीचा रंगही पिवळा होणे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, सर्वसामान्य ताप आणि हेपेटायटिसच्या लक्षणात फरक असतो. उदाहरणार्थ, सामान्य तापात पोटात दुखणे, लघवीचा रंग पिवळा होणे ही लक्षणे दिसत नाहीत, तर हेपेटायटीस मध्ये ही लक्षणे हमखास असतात. अर्थात, अशी लक्षणे अन्य आजाराचीही असू शकतात. त्यामुळे ही लक्षणे दिसू लागल्यावर वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेपेटायटिसची चाचणी

रुग्णात वरील लक्षणे दिसत असतील, तर सर्वात प्रथम त्याची लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) केली जाते. यातून यकृत योग्य तर्‍हेने काम करत आहे की नाही, हे समजते. या चाचणीत यकृताचे काम बिघडले असल्याचे आढळून आले, तर हेपेटायटिस विषाणू आहे की नाही, याची तपासणी केली जाते.

हेपेटायटिस धोकादायक का

हेपेटायटिस धोकादायक असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे याचा संसर्ग झाल्याचेच लवकर कळत नाही. अनेकवेळा लोकांना याचा संसर्ग झालेला असतो; पण त्यांना वर्ष, दोन वर्षे कळतच नाही. या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते.

हेपेटायटिस-बी चे प्रकार

हेपेटायटीस-बी चे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अक्यूट किंवा तीव्र हेपेटायटिस-बी आणि दुसरा दीर्घकालीन किंवा क्रॉनिक हेपेटायटिस-बी. पहिल्या प्रकारात हेपेटायटिसचा संसर्ग सहा महिन्या पर्यंत राहू शकतो. हेपेटायटिस-बी पॅनल टेस्ट केल्यावर अक्यूट हेपेटायटिस-बी बद्दल कळून येते. रुग्णाच्या रक्तात हेपेटायटिस-बी चा विषाणू सहा महिन्याहून अधिक काळ असेल, तर त्यावर क्रॉनिक हेपेटायटिस-बी चे उपचार केले जातात. हा प्रकार जास्त धोकादायक आहे.

लस टोचून घेणे आवश्यक

हेपेटायटिस-बी ची लस टोचून घेणे आवश्यक आहे. अर्थात, प्रौढ लोकांना ही लस टोचण्याची आवश्यकता नाही; पण डॉक्टर सर्वच लोकांना ही लस टोचून घेण्याचा सल्ला देतात. एका वर्षा पर्यंतच्या सर्व लहान मुलांना ही लस टोचणे आवश्यक आहे. ज्यांची किडनी खराब आहे आणि डायलिसीसवर आहेत, अशांनी ही लस टोचून घ्यावी. ज्यांना वारंवार रक्त बदलावे लागते. गरदोरपणात, शरीरावर गोंदून घेणारे, असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणारे, कुटुंबात कुणाला हेपेटायटिस-बी झाला असेल, तर त्या कुटुंबातील इतरांनी. मात्र, ज्यांनी ही लस पूर्वी टोचून घेतली असेल, त्यांनी पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही. त्याच प्रमाणे गरोदरपणात हा आजार होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, आईला जर हेपेटायटिस-बी झाला, तर त्याचा संसर्ग होणार्‍या बाळालाही होऊ शकतो. आईला आधी पासूनच हेपेटायटिस-बी असेल, तर त्याबद्दल डॉक्टरांना सांगण्याची आवश्यकता आहे. ज्या महिलांनी हेपेटायटिस-बी ची लस टोचून घेतली आहे, अशा महिलांनीही गरोदरपणात याबाबत तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बाळ जन्माला आल्यावर त्याला ही लस टोचून त्याचे या आजारापासून रक्षण करता येते.

यकृताची काळजी घ्या

हेपेटायटिस-बी व्हायचा नसेल, तर यकृत तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स-

सकाळी एक ग्लास कोमट पाणी आणि दिवसभरात कमीत कमी दोन लिटर कोमट किंवा सामान्य स्वच्छ पाणी प्या.

मद्यपान करू नका. डॉक्टरना न विचारता औषधे घेऊ नका.

लिंबू, ग्रीन टी, फळांचा रस प्या.

सात किंवा पंधरा दिवसांतून एक दिवस उपवास करा आणि त्या दिवशी फक्त फळांचा रस प्या. त्यामुळे यकृताला लाभ होईल.

प्रक्रिया केलेले अन्न, ज्यात मोठ्या प्रमाणावर प्रिजर्व्हेटिव, फॅटस् आणि कोलेस्ट्रॉल असते. खाऊ नका. म्हणजे फास्ट फूड, खूप तळलेले पदार्थ वगैरे.

पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

लसूण आणि आक्रोडचे सेवन करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

10 तास ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

12 तास ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

15 तास ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

16 तास ago

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…

19 तास ago

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

1 दिवस ago