मनोरंजन

बिग बॉस मराठी 6 मध्ये पहिलीच मारामारी! रुचिताने करणला मारल्याने घरात तणाव, प्रेक्षक संतप्त

मुंबई: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या जोरदार चर्चेत आहे. घरात रोज काही ना काही वाद, भांडणं आणि राडे पाहायला मिळत असून आता या सीझनमधील पहिलीच मारामारी समोर आली आहे.

बिग बॉसने स्पर्धकांना जोडीच्या बेडीत अडकवण्याचं ट्विस्ट दिल्यानंतर घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात तब्बल आठ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यानंतर आता घरात कॅप्टन्सी कार्य पार पडणार असून, त्यासाठी स्पर्धकांना पापड लाटून उमेदवारी मिळवायची आहे.

प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्यानुसार, बिग बॉसने घरातील सदस्यांना दोन गटात विभागून पापड लाटण्याचं कार्य दिलं आहे. विरोधी टीमचे पापड होऊ नयेत यासाठी दोन्ही गट एकमेकांचं पीठ काढून घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. याच दरम्यान प्रचंड खेचाखेची झाली.

या गोंधळात करणने रुचिताच्या डोक्यावर पीठ ओतलं. यामुळे संतापलेल्या रुचिताने थेट करणला मारलं. हा प्रकार पाहून करण चांगलाच भडकला असून घरातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे.हा प्रोमो पाहून प्रेक्षकही संतापले असून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

“करण भाऊ आता रुचिताला सोडणार नाही,”“रुचिताला त्वरित बाहेर काढा,”“आर्याने निकीला मारलं होतं तेव्हा तिला बाहेर काढलं, मग आता रुचिताला का नाही?”अशा तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.आता रुचिताला शिक्षा होणार की थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.हे सगळं पाहण्यासाठी विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6, दररोज रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

15 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

23 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago