आरोग्य

बटाटे खाऊन वजन वाढत असं तुम्हालाही वाटतं का जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल करतं. असे अनेक लोक जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांन वाटतं की, बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं. पण खरंच बटाटे खाऊन वजन वाढतं का? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत डॉक्टर सांगतात की, बटाटे खाऊन वजन वाढेल हे काही गरजेचं नाहीये. वजन कमी करण्यासाठी लोक आहारातून बटाटे दूर करतात. बटाटे खाऊन वजन वाढतं असं लोकांना वाटतं की, कारण यात कार्ब्स भरपूर असतं.

बटाटे खाऊन खरंच वजन वाढतं का

ज्या लोकांना वजन वाढवायचं असतं त्यांच्यासाठी बटाटे खाण्याची पद्धत वेगळी असते. वजन वाढण्यामागे तुमचा एकंदर आहार गरजेचा असतो. केवळ बटाटे खाऊन वजन वाढत नाही. बटाटे खाण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती असतात. जर तुम्ही बटाटे फ्राय करून लोणी किंवा क्रीमसोबत खात असाल तर तुमचं वजन वाढेल. लोणी आणि क्रीम बटाट्या सोबत मिक्स केल्याने कॅलरीचं प्रमाण वाढतं जे ज्यामुळे फॅट वाढतं. बटाटे खाल्ल्याने शरीराला भरपूर शक्ती मिळते. याने थकवा आणि कमजोरी दूर होते.

पचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही फायबर भरपूर असलेले बटाटे खाऊ शकता किंवा अपचन वा बद्ध कोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही बटाटे खाऊ शकता. बटाटे खाऊन वजन वाढू शकतं, पण हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर असतं, ज्यामुळे ऊर्जा मिळते. पण बटाटे बनवण्याची पद्धत आणि प्रमाण यामुळे वजन वाढू शकतं.

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतं. जे शरीरात ग्लूकोजच्या रूपात अवशोषित होतं आणि वजन वाढू शकतं. बटाटे तळून खाल्ल्याने वजन वाढू शकतं. कारण यात अतिरिक्त कॅलरी अधिक असतात. मात्र, बटाट्या मधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरासाठी आवश्यक असतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

26 मिनिटे ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

21 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

21 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

21 तास ago