भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आजचा दिवस कसा असेल

मेष: आज स्थिती फारसी चांगली राहणार नाही. नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. बुद्धीवर पडदा पडल्यासारखा अनुभव कराल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा.

वृषभ: आज आपणास रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. वारसा अधिकार मिळेल. विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत. नोकरी व्यवसायानिमिल परदेश प्रवास होतील.

मिथुन: आज मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.

कर्क: आज आपले व्यक्तीमत्व आपल्या कामाच्या ठिकाणी प्रभाव व लौकिकता वाढवणार आहे. बंधुप्रेम मिळणार आहे. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. शुभ संदेश मिळतील.

सिंह: आज व्यापारात व्यावसायिकांनी मोठे व्यवहार टाळावेत. खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये. ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावेत. बँकेत कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणारे दिनमान राहील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल.

कन्या: आज नोकरी व्यवसायात समाधानकारक सुधारणा जाणवेल. पुर्वीचे प्रकल्प व कामे आज आपणास मदतीला येणार आहेत. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे.

तूळ: आज उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक प्रगतीच्या नवीन व संधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. काहींना नोकरीत प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल.

वृश्चिक: आज दिवस उत्तम राहील. संकुचित मनोवृति टाळा. आपल्या योजना आज सफल होणार आहेत. सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. आध्यात्मिक देवधर्म यावर श्रद्धा वाढेल. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. नोकरदारांना नोकरीत उत्कृष्ट प्रस्ताव येतील.

धनु: आज आपणास प्रतिकुल फले मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बोलघेवडेपणा शक्यतो टाळा. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल अशी स्थिती आहे.

मकर: आज आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिनमान लाभेल. रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. काहीना पगारवाढ व बदलीची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे.

कुंभ: आज दिवसभर मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम दुर ठेवा. नोकरीतील बदल फायदेशीर ठरणार आहे. आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल.

मीन: आज कामात यश लाभेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

36 मिनिटे ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

3 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

21 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago