आरोग्य

हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय

पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला येणे हा त्रास सुरु होतो. रखरखत्या उन्हात घराच्या बाहेर गेल्याने आपण घामाने भिजतो. परंतु अनेकदा आपल्या हाता-पायांना सतत घाम येतो.

उन्हाळ्यात हातांना वारंवार घाम येणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याला हायपरहाइड्रोसिस असं म्हटलं जाते. जेव्हा आपल्या घामाच्या ग्रंथी सामान्यपेक्षा जास्त सक्रिय होतात तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. घाम आल्याने शरीरातील तापमान नियंत्रित राहाते.परंतु, हाताला सतत घाम आल्याने आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. जेव्हा आपण कुणाला तरी शेक हॅन्ड करतो, मोबाईल किंवा लॅपटॉप वापरतो तेव्हा ही समस्या आणखी त्रासदायक ठरु शकते.

हातांना घाम का येतो

1) हायपरहाइड्रोसिस: ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील घामाच्या ग्रंथी जास्त घाम निर्माण करतात. ज्यामुळे हात आणि पायांवर जास्त परिणाम होतो.

2) ताण आणि चिंता: अति ताण किंवा सतत चिंतेत असाल तर साहाजिकच हातांना घाम येणे सामान्य आहे.

3) उष्ण आणि दमट हवामान: उन्हाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे आपल्याला घाम जास्त येतो.

4) थायरॉइड समस्या: थायरॉइड ग्रंथातील अनियमिततेमुळेही हातांना जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो.

5) कॅफिन आणि मसालेदार पदार्थ: जास्त मसालेदार पदार्थ आणि कॅफिनचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढून घाम येऊ शकतो.

हातांना सतत घाम येत असेल तर हे उपाय करा 

1) अँटीपर्स्पिरंट वापरा: हातांवर अँटीपर्स्पिरंट लावल्याने घामाच्या ग्रंथी नियंत्रित होतात, ज्यामुळे हातांना येणारा घाम कमी होतो.

2) बेकिंग सोडा: बेकिंग सोड्यामध्ये अँटीपर्स्पिरंट गुणधर्म असतात. ते पाण्यात मिसळून हातांना लावल्यास घाम कमी होण्यास मदत होते.

3) ॲपल सायडर व्हिनेगर: ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले अ‍ॅस्ट्रिंजंट घटक हातांना जास्त घाम येण्यापासून रोखतात.

4) पुदिना आणि कडुलिंबाचे पाणी: पुदिना आणि कडुलिंबाच्या पाण्याने हात धुतल्याने तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत होते. तसेच हातावर येणारा घामही कमी होतो.

5) टॅल्कम पावडर: हातावर टॅल्कम पावडर लावल्याने घाम शोषण्यास मदत होते आणि हात कोरडे राहतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

1 तास ago

गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…

1 तास ago

पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण नको; दोषींवर कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…

1 तास ago

विधान परिषद निकालाने भाजपला जनतेचा इशारा; महायुतीच्या परतीचे दिवस सुरु;  विजय वडेट्टीवार

‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…

1 तास ago

‘भ्रष्टाचाराच्या मलईसाठी गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला’; हर्षवर्धन सपकाळ

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…

1 तास ago

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान ऑनलाइन जमा; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील सहाय्यक परिरक्षण अनुदानाचा पहिला हप्ता…

2 तास ago