भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठिक असून ऑफिस आणि व्यवसायाच्या कामात तुम्हाला जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल. तुम्ही हुशारीने घेतलेले निर्णय लाभदायक सिद्ध होतील. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. संध्याकाळी एखाद्या समारंभात सहभागी होणार आहात.

वृषभ: आजचा दिवस फारसा ठिक नाही. संपत्तीचे वाद तुमचे नुकसान करणार आहेत. भौतिक सुखात वाढ होणार आहेत. तुमचे विचार इतरांसमोर ठामपणे मांडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रवास करताना काळजी घ्याल. ऑफिस आणि व्यवसायात काम वाढत आहे त्याकडे नीट लक्ष द्या.

मिथुन: आजचा दिवस ठिक असून नवीन योजना बनविणार आहात. कर्ज कमी होईल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज खर्च जास्त आहेत, जे गरजेचे आहे तेच खरेदी करा. अनावश्यक खर्च टाळावा. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी समजेल. व्यवसायात कामे वाढत आहेत तेव्हा फोकस आणि नियोजन नीट करा. आर्थिक स्थिती ठिक आहे त्यामुळे गुंतवणूक करा.

कर्क: आजचा दिवस ठिक असून तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. कुटुंबातील सदस्य आणि ऑफिसच्ये सहकारी यांच्यासोबत संबंध अधिक चांगले होतील. संध्याकाळी आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. दानधर्म करणार असून चांगल्या कामासाठी खर्च करणार आहात. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.

सिंह: आजचा दिवस आज महत्वाकांक्षी स्वभाव असलेल्या लोकांसाठी शुभ आहे. पहिला दिवस प्रवासासाठी लाभकारी राहील. दुपारनंतर उच्च अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे कायदेशीर बाबी नवीन वळण घेतात. संध्याकाळी योजनांची पूर्तता होईल आणि लाभ मिळेल. अचानक पाहुण्यांचा आगमन खर्च वाढवू शकतो.

कन्या: आजचा दिवस चांगला असून व्यापारात चांगला नफा आहे. तुम्ही आज समाधानी असाल. जे काही वाद सुरु होते त्यावर तोडगा निघेल आणि तुमच्या मनावरचे ओझे कमी होईल. वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. कुटुंबीयांसोबत संबंध सुधारतील. तुम्ही जी काही कामे हाती घेतली आहेत ती पूर्ण करणार आहात.

तुळ: आजचा दिवस चांगला असून करियरमध्ये यश मिळेल. अचानक धनलाभाचा योग असून बँक बॅलन्स वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांच्या अधिकारात वाढ होईल. स्पर्धा परिक्षेत उत्तम यश मिळेलय आज दिवसभर प्रगतीचे योग आहेत. संध्याकाळी मंगलकार्यात सहभागी होणार आहात

वृश्चिक: आजचा दिवस शुभ असून करिअरमध्ये यश आणि व्यवसायात उत्तम प्रगती होणार आहे. उच्च अधिकारी किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती यांच्यासोबत भेट होईल. तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. कारण पचनाची समस्या होवू शकते. प्रवासाचा योग असून धनलाभाचे योग आहेत.

धनु: आजचा दिवस चांगला असून तुमची प्रगती होणार आहे. आज धार्मिक कार्यात तुमची रूची वाढेल आणि तुम्ही त्यात व्यस्त असाल. नवीन व्यवसायातून लाभ होईल. नव्या योजना तसेच प्रोजेक्ट येणार आहेत तेव्हा तयार राहा. भावंडांकडून समाधान मिळेल तसेच जुन्या आठवणींना उजाळा द्याल. तुम्ही राजकारणात असाल तर तुम्हाला यश मिळेल.

मकर: आजचा दिवस धनलाभाचा आहे. प्रवासाचा योग असून त्यात तुमचाच फायदा आहे. तुमचे बोलणे इतरांना प्रभावीत करेल. तसेच तुमचे कौशल्य आणि हुशारी यामुळे कामे मार्गी लागतील. पैशांच्या व्यवहाराबाबत सावध राहा. पैसे गमाविण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना सफल होतील. घरात वातावरण ठिक असेल.

कुंभ: आजचा दिवस शुभलाभाचा असून तुमची कामे मार्गी लागणार आहेत. जी कामे पूर्ण करताना तुम्हाला अडचण येत होती ती कामे पूर्ण होतील. धनलाभाचा योग आहे. खर्चावर लक्ष द्या अन्यथा तुमचे बजेट गडबडू शकते. विरोधक आणि शत्रू तुमचं काहाही करू शकणार नाही. तुमचा खरेपणा तुम्ही सिद्ध कराल. योजना यशस्वी होवून आर्थिक प्रगती होईल.

मीन: आजचा दिवस ठिक असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार असून तुम्ही समाधानी असाल. धार्मिक कार्यात रूची वाढेल आणि तुम्ही दानधर्म कराल. व्यापाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबात वातावरण सुख-समृद्धीचे असेल. थांबलेली कामे मार्गी लागणार असून धनलाभाचे योग आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…

3 तास ago

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…

6 तास ago

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…

9 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago