मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील ‘मलिदा गॅंग’ पासुन तरुणांनी सावध राहण्याची गरज…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर-हवेली मतदारसंघात विधानसभा निवडणुक अंतिम टप्यात आली असुन शिरुर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये स्क्रॅप, लेबरची, ट्रान्सपोर्टची कामे देऊ अशी आमिषे दाखवुन सध्या मलिदा गॅंग तरुणांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करत आहेत. त्यांच्या या आमिषाला बळी पडून काही तरुणवर्ग या मलिदा गॅंग मध्ये सहभागी झाले आहेत. मात्र केवळ निवडणुकीपर्यंत हि मलिदा गॅंग या तरुणांना केवळ बळीचा बकरा करणार आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे तरुणांना या गॅंग पासुन सावध राहावे लागणार आहे.

यासाठी मागील जिल्हा परिषद निवडणुकीचा एक अनुभव पुरेसा आहे. शिरुर ग्रामीण-न्हावरे या जिल्हा परिषद गटाची मागील टर्मची पंचवार्षिक निवडणुक पार पडली. करडे व तर्डोबाची वाडी येथील दोन उमेदवारांत हि निवडणुक चांगलीच रंगली होती. आमदार पुत्र उमेदवार असल्याने व त्यांना सर्वसामान्य जनतेची सहानुभूती असल्याने ते ही निवडणूक सहज जिंकतील असा आशावाद जाणकारांना होता. मात्र याच वेळी ही ‘मलिदा गॅंग’ सक्रीय झाली.

त्यांच्या दिमतीला फॉरच्युनर, ऑडी, इन्होवा, अशा चकचकीत गाड्या. त्या चकीचकीत गाड्यांमध्ये असणारे व उच्चभ्रू राहणीमान ठेवणारे दादा, आप्पा, भाऊ असे ‘मलिदा सम्राट’ या गॅंगची तालुक्यातील बेरोजगार तरुणांना भुरळ पडली. आम्ही तुम्हाला निवडणुकीनंतर औद्योगिक वसाहती मध्ये काम देऊ, ठेकेदारी देऊ अशी आमिषे दाखवत त्यांनी तरुण वर्गाला प्रचाराला जुंपवले.

संपुर्ण जिल्हा परिषद गटात हीच अमिषे ही गॅंग दाखवत गेली आणि झाडुन सारा तरुण वर्ग या गॅंगच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. शेवटच्या दोन दिवसात वातावरण फिरले आणि जनतेची सहानुभूती असलेला उमेदवार पराभूत झाला आणि मलिदा गॅंग मधील उमेदवार विजयी झाला. तरुणांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात विजय उत्सव साजरा झाला आणि गावोगावी जंगी स्वागत केले.

त्यानंतर निवडणुक संपली, उमेदवार विजयी झाला. नव्याचे नऊ दिवस संपले. दादा, भाई, आप्पा, भाऊ आज ना उद्या ठेकेदारी देण्यासाठी फोन करतील अशी आशा या तरुणांना होती. मात्र तसे काही घडले नाही. मग या तरुणांनी भाऊ, दादा, आप्पा यांना फोन लावायला सुरुवात केली. मात्र या तरुणांना कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांनी वाजणारा फोन ही सतत बिझी यायला लागला. या तरुणांचे फोन ब्लॅक लिस्ट मध्ये गेले, ब्लॉक झाले.

त्यानंतर या तरुणांना ना.. काम मिळाले… ना ठेकेदारी मिळाली, ना कामाचा मोबदला मिळाला. तेलही गेले तुपही गेले, हाती धुपाटणे आले अशीच अवस्था या तरुणांची झाली. पाच सहा वर्षांपूर्वीचा हा अनुभव गाठीशी असताना पुन्हा या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ही मलिदा गॅंग बेरोजगार तरुणांचे ब्रेन वॉश करुन, त्यांना अमिषे दाखवून सक्रिय झाली आहे. म्हणूनच आत्ताच्या या निवडणुकीत तरुणांनी या मलिदा सम्राटांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे.

शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…

Loading ...
Loading ...
Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

11 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago