मेष: मन शांत असेल आणि घरात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी वाद-विवाद टाळा. कला क्षेत्रात आवड निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. भाऊ-बहिणीसोबत वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत.
वृषभ: कुटुंबासोबत एखाद्या धार्मिकस्थळी भेट देऊ शकता. कौटुंबिक जीवनात काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. मित्र आणि आई-वडिलांच्या सहकार्याने नव्या कार्याची सुरुवात कराल.
मिथुन: आत्मविश्वासात वाढ होईल मात्र रागावर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. व्यापारात मोठा नफा होईल. मानसिक शांतीसाठी धार्मिक यात्रेवर जाण्याची योजना बनवू शकता. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य मिळेल.
कर्क: मुलांनी शैक्षणिक विषयांकडे लक्ष द्या. व्यापारात व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. समस्या लगेचच कमी होणार नाहीत.
सिंह: मन प्रसन्न राहील. व्यवसायात चांगला नफा होईल. बऱ्याच दिवसांनी शाळा किंवा कॉलेजमधील मित्र-मैत्रिणीसोबत भेट होईल. उत्पन्नात वाढ होईल. वायफळ खर्च टाळा. भावंडांसोबत मिळून नवा व्यापार सुरू करण्याचा विचार कराल.
कन्या: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. घरात धार्मिक कार्य होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये कामाचा व्याप वाढेल.
तूळ: आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण कराल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. नोकरीत परिवर्तन शक्य आहे.
वृश्चिक: आत्मविश्वास प्रचंड असेल मात्र, मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. नोकरीत प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्नात वाढ होईल. कार्यक्षेत्राचा विस्तार होऊ शकेल. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. घरात आनंदाचे वातावरण असेल.
धनु: घरी अचानक मित्र किंवा दूरच्या नातेवाईकांचे आगमन होईल. वायफळ खर्च टाळा. गुंतवणूक करण्यावर भर द्या. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी चालून येईल. नोकरीच्या ठिकाणी वाद-विवाद टाळा.
मकर: मन प्रसन्न राहील. उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. नोकरीत परिवर्तन होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अडचणी, समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ: घरात धार्मिक कार्य होऊ शकतात. गरिबांना अन्न दान करा. कामानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा प्लान कराल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
मीन: नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या जोरावर तुम्ही आपली एक वेगळी ओळख बनवाल, वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवी गाडी घेण्याचा विचार कराल. संपत्तीत गुंतवणूक करण्याचं प्लानिंग कराल.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…