महाराष्ट्र

मराठी चित्रपट निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांना पितृशोक…

मुंबई: नुकताच येऊन गेलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले आहे. गेली काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कांदिवली येथील ‘विन्स हॉस्पिटल’मध्ये उपचार सुरु होते.

प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी नेण्यात आले होते. मात्र काही दिवसांत पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २ डिसेंबर रोजी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तेथेच त्यांना ‘तीव्र ब्रेन स्ट्रोक’चा झटका आल्याने निधन झाले. उच्च-तंत्रविद्याविभूषित असलेल्या रविंद्र मगर यांनी नुकतेच वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केले होते.

इंजिनीरिंग क्षेत्रात व्यावसायिक म्हणून त्यांनी भरीव कार्य केले असून अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा समृद्ध परिवार आहे. त्यांचे सुपुत्र कॅप्टन कल्पेश हे मास्टर मरिनर असून त्यांनी नुकताच विजय पाटकर दिग्दर्शित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपट निर्माण केला आहे तर जेष्ठ पुत्र भूषण व्यवसायाने वकील असून बांधकाम आणि वाहतूक व्यवसायात सक्रिय आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago