भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला असून तुमची ऑफिसच्या कामात प्रगती होणार आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील आणि ऑफिसमध्ये तुमचे कौतूक होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा असून गुंतवणुकीबाबत मनात शंका असेल. तब्येतीत सुधारणा असून प्रियजन आणि घरातील सदस्य तुमची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून अथक प्रयत्न करतील. प्रवासामुळे त्रासाची शक्यता आहे म्हणून प्रवास टाळावा. लवलाइफ ठिक आहे पण तुमच्यात थोडा नाराजीचा सूर असेल.

वृषभ: आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्तम असून आर्थिक स्थिती सुधारेल आणि धनलाभाचे संकेत आहेत. कामाच्या बाबतीत मेहनत आहे आणि काही कारणाने मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. लवलाइफ ठिक पण एसएमएस किंवा मेसेज पाठवताना तो आधी नीट वाचा अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या बाबतीत रणनीती आखा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. तब्येत सांभाळा कारण पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. प्रवासात यश आहे. आठवड्याच्या शेवटी जीवनात सुखसमृद्धीचे योग आहेत.

मिथुन: आजचा दिवस चांगला असून तुमच्या प्रत्येक कामात कुटुंबाची साथ मिळेल. जीवनात सुख समृद्धीचे योग असून आर्थिक स्थितीत सुधारणा आहे. ऑफिस किंवा व्यवसायात विचारपूर्वक घेतलेले निर्णय शुभ परिणाम देतील. लवलाइफ चांगली आहे. योगासन आणि ध्यान यामुळे आरोग्याच्या बाबतीत उत्तम सुधारणा होईल. आठवड्याच्या शेवटी महिलेमुळे तुमचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

कर्क: आजचा दिवस उत्तम असून प्रवासाचा योग आहे. प्रवासात लाभ होईल त्यामुळे प्रवास करा. लवलाइफ चांगले आहे, प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत सुधारणा हवी असेल तर कामात आळस नको. फोकस ठेवा आणि मेहनतीने पुढे जा. तब्येतीकडे लक्ष द्या. घरात तुम्हाला हवे असणारे बदल त्वरित होणार नाहीत म्हणून तुम्ही निराश होवू नका. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल होतील.

सिंह: आजचा दिवस चांगला असून कुटुंबातील एखादी महिला तुम्हाला आर्थिक बाबतीत मदत करेल. तुम्हाला सुखद अनुभव मिळेल. लवलाइफ ठिक आहे पण एकमेकांना समजून घ्या. आर्थिक बाबतीत खर्च जास्त आहे त्यामुळे गुंतवणुकीबाबत चिंता वाढू शकते. मेहनतीचे फळ मिळेल त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. प्रवासात फारसा लाभ नाही त्यामुळे तो पुढे ढकलावा. आठवड्याच्या शेवटी, घराच्या सजावटी संदर्भात काही खरेदी कराल.

कन्या: आजचा दिवस चांगला असून आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग आहेत. नवीन गुंतवणुकीमुळे चांगले परिणाम मिळतील. लवलाइफ ठिक आहे फक्त एकमेकांना नीट समजून घ्या. ऑफिसच्या कामात थोडा त्रास आहे तसेच काही बातम्या तुमचे मन दुखवू शकतात. कुटुंबात सुख समाधान नांदावे म्हणून तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत बिघडू शकते, तेव्हा काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचा योग आहे पण तो टाळणे उत्तम आहे.

तुळ: आजचा दिवस कामात प्रगतीचा असून नवीन प्रोजेक्ट शुभ परिणाम देतील. आर्थिक स्थिती सुधारणा असून गुंतवणुकीतून फायदे होतील. कुटुंबात वातावरण हसते खेळते असेल. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला ऐका तुमची कामे पटापट मार्गी लागतील. तब्येतीची काळजी घ्या आणि जंक फूड खाणे टाळा. प्रवासात शुभयोग आहेत त्यामुळे प्रवास करा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही शांतपणे वेळ व्यतीत करणार आहात.

वृश्चिक: आजचा दिवस कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रोजेक्ट यशाच्या मार्गावर आहेत. तुम्ही प्रोजेक्टचे काम पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात ठेवाल. तब्येतीत सुधारणा आहे तसेच घरातील समाधानी वातावरणामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळणार आहे. लवलाइफमध्ये थोडे वाद होतील पण संवाद साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत खर्च जास्त आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.

धनु: तुम्ही करिअरमध्ये एक नवीन टप्पा गाठणार आहात. लवलाइफ ठिक असून प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. नोकरीमध्ये रिलोकेशचा विचार करत आहात आणि जोडीदाराची याला साथ मिळेल. तब्येतीत सुधारणा आहे. प्रवास टाळा, अन्यथा कष्ट होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी ताण तणाव वाढण्याची शक्यता असून झोपेवर परिणाम होवू शकतो.

मकर: आजचा दिवस चांगला असून तुम्हाला प्रोजेक्टसंबंधी चांगली बातमी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. लवलाईफ ठिक आहे. तुम्ही जास्त खरेदी करणार आहात. तुम्हाला प्रियजनांकडून धोका होऊ शकतो किंवा तुम्ही फसवले जावू शकता. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा खूप महागात पडेल, वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवासात यश आहे त्यामुळे प्रवास करा. तुम्हाला जे काही बदल अपेक्षीत आहेत ते लगेच होणार नाहीत त्याला थोडा वेळ द्या, याची जाणीव आठवड्याच्या शेवटी होईल.

कुंभ: आजचा दिवस ठिक असून तब्येतीत उत्तम सुधारणा होणार आहे. तुम्ही जीवनशैलीत केलेला बदल चांगले परिणाम देणार आहे. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल. कार्यक्षेत्रात मेहनत जास्त आहे आणि एखाद्या महिलेमुळे तुमचे टेन्शन थोडे वाढू शकते. या आठवड्यात प्रवास करताना भावनिक ताण येवू शकतो, त्यामुळे प्रवास टाळावा. लवलाइफमध्ये सुसंवाद साधा, अन्यथा समस्या होऊ शकतात. कुटुंबात काही कारणाने अडचणी येवू शकतात. आठवड्याच्या शेवटी सुखद बातमी मिळेल.

मीन: आजचा दिवस म्हणजे कार्यक्षेत्रात प्रगती असून ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे जीवनात नवीन मार्ग दिसतील. निर्णय पटापट घ्या म्हणजे कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत धनलाभाचा योग असून गुंतवणूक करू शकता. प्रवासात यश मिळेल त्यामुळे प्रवास करावा. तब्येतीकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी घरात काही मंगलकार्यासंदर्भात चर्चा होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago