भविष्य

जाणून घ्या आपल्या राशींनुसार आपला दिवस कसा असेल

मेष: आज तुमचं कौतुक होईल. कोणी तरी कामाच्या ठिकाणच्या तुमच्या कामगिरीबद्दल तुम्हाला निराश करणारे उद्गार काढले, तरी दुर्लक्ष करा. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करणं दिलासादायक ठरेल.

वृषभ: आजचा दिवस एका वेळी एकाच गोष्टीकडे लक्ष देण्याचा आणि एकाच गोष्टीचं नियोजन करण्याचा आहे. तुमचे प्रवासाचे बेत या महिन्यातल्या नंतरच्या दिवसांसाठी राखून ठेवा. प्रगतिशील आध्यात्मिक संवेदनेसाठी चांगले संकेत आहेत. पैशांचा अडकलेला प्रवाह सुरळीत होईल.

मिथुन: आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त सदुपयोग करा. कारण तुमचा उद्देश, हेतू याच्याशी ऊर्जा पूर्णपणे अनुकूल आहे. एखाद्या नातेवाईकाला आर्थिक मदत लागू शकेल. एखादी जवळची व्यक्ती बऱ्याच काळानंतर आज संध्याकाळी अचानक तुम्हाला भेटायला येण्याची शक्यता आहे.

कर्क: अचानक शॉपिंग किंवा आउटिंगमध्ये तुम्ही रमू लागाल. तुम्ही आधीच एखादं वचन दिलं असेल, तर डेडलाइन अगदी काटेकोरपणे पाळायला हवी. घरगुती कामात आज मदतीचा अभाव जाणवेल. त्यामुळे दैनंदिन कामात अडथळे निर्माण होऊ शकतात.

सिंह: टीमवर्कमुळे बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. एखाद्या नव्या व्यक्तीसोबत कोलॅबोरेशन करण्याची संधी मिळाली, तर ती तुम्ही स्वीकारलीच पाहिजे. कामाच्या ठिकाणी झालेल्या मोठ्या वादावादीमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकेल.

कन्या: तुमचं काम अडकून बसलं असेल आणि ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एखाद्याचा इगो कुरवाळावा लागणार असेल, तर तसं करावं. सध्याच्या काळात अल्पकालीन नियोजन उपयुक्त ठरु शकतं. आज पाहुण्याचं स्वागत करावं लागलं, तर तुमच्या घरात पुरेशी तयारी आहे ना, याची खात्री करुन ठेवा.

तूळ: आजचा दिवस कुटुंबीयांसमवेत प्रत्यक्ष घरात किंवा व्हर्च्युअली व्यतीत करण्यासाठी उत्तम आहे. काम वाढू शकेल आणि तुमचं योगदान किती आहे, याचा आढावा घ्यावा लागेल. चांगलं वर्कआउट केल्यास तुम्हाला आवश्यक तेवढी ऊर्जा पुन्हा मिळू शकेल.

वृश्चिक: तुम्हाला आज जुन्या छंदाची आठवण येईल. आजच्या दिवसाची ऊर्जा प्रगतिशील आहे; मात्र वेग संथ आहे. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असलात, तर अलीकडेच तुमचं जे काही नुकसान झालं आहे ते भरुन निघू शकेल.

धनू: खूप दूरवरुन किंवा परदेशातून आलेल्या एखाद्या कॉलमुळे तुमचा दिवस छान जाईल. तुम्हाला खास वाटेल. एखाद्या छोट्या ट्रिपचा प्लॅन यशस्वी होईल. तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रश्नांची तातडीने उत्तरं देणं आवश्यक आहे.

मकर: नवं हेल्थ रुटीन सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादं पुस्तक किंवा लेख यांमुळे त्यासाठीची प्रेरणा मिळू शकेल. एखादी गोष्ट हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल, ती मिळू शकेल.

कुंभ: तुम्ही करायचा विचार करत असलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये प्रगती होत असल्याचे संकेत तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या आतल्या आवाजाचं ऐका आणि तुमच्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस संमिश्र निकालांचा असेल.

मीन: एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या सूचनेमुळे बराच महत्त्वाचा वेळ वाचेल. एखादा प्रलंबित राहिलेला निर्णय घेण्यासाठी आता तुम्हासा आत्मविश्वास वाटेल आणि निर्णय घेण्याची तुमची मानसिकताही होईल. आज मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांना प्राधान्य द्याल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

1 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

3 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

3 तास ago