महाराष्ट्र

महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या: रुपाली चाकणकर

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात (दि. १६) सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या (दि. १६) रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. केंद्र शासनाकडून सप्टेंबर महिना पोषण महा म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधत आयोगाकडून पोषण पंचायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दु. १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात आहारतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अंगणवाडी सेविका, महिला, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

पारंपारिक खाद्यातून पोषक आहार यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर दु. ३ वाजता अध्यक्षा रायगड जिल्ह्याची आढावा बैठक घेणार असून यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. उपरोक्त सर्व कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन, रायगड येथे होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होतो आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते, त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग याद्वारे करत आहे. रायगड जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणी अधिकाधिक महिलांना पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

5 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

5 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

11 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

11 तास ago