मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील धोकादायक व्यक्ती एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध

निवडणूक पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची ठोस कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): आगामी परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील सराईत व धोकादायक इसमाला महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे, वाळू तस्कर, महिलांविरोधातील गुन्हे करणारे, सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोलेगाव येथील रहिवासी दिपक बबन गुंजाळ (वय ३३) याच्यावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सदर व्यक्तीविरुद्ध यापूर्वी बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणे, संगनमत करून घातक हत्यारांनी मारहाण करणे, जबर दुखापत पोहोचवणे, शिवीगाळ व दमदाटी करणे अशा स्वरूपाचे तीन गंभीर गुन्हे दाखल होते. तो सराईत व धोकादायक असल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी त्याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.

या प्रस्तावाचे परीक्षण करून पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तो पुढील कार्यवाहीसाठी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने एम.पी.डी.ए. कायदा १९८१ (सुधारित अधिनियम २०२५) अन्वये दिपक गुंजाळ याला स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला.

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वतंत्र पथकांनी संयुक्त कारवाई करत दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी दिपक गुंजाळ यास ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दाखल केले. त्यामुळे शिरूर शहर व तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा कठोर कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

8 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

8 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

8 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

12 तास ago