शिरुर (अरुणकुमार मोटे) गावात लग्न समारंभाच्या नियोजन आटोपुन घरी परतणाऱ्या एका नागरिकास पिंपरखेड – पंचतळे रस्त्यावरील रंगनाथ बाबा मंदिराजवळ अज्ञात इसमांनी जबर मारहाण करुन लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि १५) रोजी रात्री सुमारे ११.३० च्या सुमारास घडली. हनुमंत सावकार वरे (वय ४१, रा. पिंपरखेड) असे या लुटमार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, वरे हे पिंपरखेड गावठाणातील भावकीच्या लग्नकार्याच्या ठिकाणी काम आटोपुन रात्री घरी परतत होते. दरम्यान, पिंपरखेड-पंचतळे रस्त्यावरील रंगनाथ बाबा मंदिराजवळ लघुशंकेसाठी थांबले असता, मास्क परिधान केलेल्या ४ ते ५ अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. या व्यक्तींनी अचानक हनुमंत वरे यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची चैन, हातातील घड्याळ, मोबाईल फोन तसेच पाकिटातील रोख ४ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत पोबारा केला.
या घटनेनंतर जांबुत, पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले असुन रात्रीच्या वेळेस निर्जन ठिकाणी नागरिकांची सुरक्षा धोक्यात असल्याचे या प्रकारातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या प्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात वरिष्ठ हजर नसल्याच्या कारणावरून अज्ञात आरोपींविरुद्ध लूट व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात उशीर करण्यात येत आहे. त्यांना बराच वेळ पोलीस स्टेशनला बसून ठेवण्यात आले आहे. एवढा गंभीर गुन्हा घडुनही पोलिसांनी कुठलीही तत्परता दाखवली नाही. यावरुन शिरुर पोलिसस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड
शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक
शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…