मुख्य बातम्या

गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद!

शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; बालाजी मोटे यांच्या गोपनीय माहितीने आरोपी जाळ्यात!

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने बेड्या ठोकल्या. गणेश राम गव्हाणे (वय ३३, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळविलेली अचूक माहिती महत्त्वपूर्ण ठरली.

२७ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास शिरूर पोलिसांचे डी.बी. पथक शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या परवानगीने पोलीस पथक व पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयास्पदरीत्या आढळलेल्या गणेश गव्हाणे याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला गावठी पिस्तूल आणि त्यामध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले.

पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खींग करीत आहेत.

बालाजी मोटे यांच्या अचूक माहितीमुळे कारवाईला यश!

गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळविणे आणि ती तातडीने वरिष्ठांपर्यंत पोहोचविणे, या कामात पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांनी दाखविलेली तत्परता या कारवाईत निर्णायक ठरली. त्यांच्या सतर्कतेमुळे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे डी.बी. पथकाच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस अंमलदार नितेश थोरात, बालाजी मोटे, संदीप खेडकर, राहुल वाघमोडे, विजय शिंदे, अर्जुन भालसिंग, अजय पाटील आणि अंबादास थोरे यांचा समावेश होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना नको; महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप…

11 मिनिटे ago

घोळूची भाजी म्हणजे शेतातील सोन्याची खाण

पर्स्लेन (पोर्टुलाका ओलेरेसिया) ही एक पानेदार हिरवी वनस्पती आहे जी बहुतेक वेळा तण मानली जाते…

55 मिनिटे ago

साखर आरोग्यास अपायकारक

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…

1 तास ago

राज्यातील १२३ शिक्षकांना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर

३ डिसेंबरला मुंबईत होणार पुरस्कार वितरण; प्राथमिक, माध्यमिकसह विविध प्रवर्गांतील शिक्षकांचा समावेश मुंबई: राज्यातील शैक्षणिक…

1 तास ago

दुष्काळग्रस्तांच्या मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या विवाहाची जबाबदारी शिवसेना घेणार; एकनाथ शिंदेंची ग्वाही!

इंगळे कुटुंबासोबत भाकरी खात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या; कर्जवसुलीसाठी धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मेहकर : दुष्काळग्रस्त…

1 तास ago

शिरुर; व्याजाच्या पैशांसाठी सतत तगादा, एकाची आत्महत्या; प्रेसनोट मध्ये पोलिसांनी आरोपीची नावे वगळली

शिरुर (तेजस फडके) गेल्या वर्षभरात शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली असुन कायदा अन सुव्यवस्था…

15 तास ago