शिरुर तालुक्यातील ‘या’ गावात भुजल पातळी खाली गेल्याने बोअरवेल घेण्यास बंदी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) सध्या शिरुर तालुक्यात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत वाढतं असल्यामुळे प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या जवळ असणाऱ्या अनेक गावात बांधकाम करण्यासाठी बोअरवेल घेण्याची स्पर्धा सुरु असल्याने भुजल पातळी मोठया प्रमाणात खालवली असल्याने एका गावातील ग्रामस्थांनी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेत गावात बोअरवेल घ्यायला बंदी घातली आहे.

 

शिरुर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या बाभुळसर खुर्द गावात दि २६ जानेवारी २०२५ रोजी गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दुपारी १२ वाजता झालेल्या ग्रामसभेत गावात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग सुरु असुन सदर प्लॉटिंग करत असताना जमीन डेव्हलपर्स हे एक एकर जमिनीमध्ये सुमारे २५ ते ३० बोअरवेल घेत आहेत. त्यामुळे गावच्या सर्व उपस्थित ग्रामस्थांनी गावातील जमीन डेव्हलपर्सवाले घेत असलेले बोअरवेल बंद करावेत अशी एकमताने मागणी केली.

 

कारण जर डेव्हलपर्स कायमच असे बोअरवेल घेत राहिले तर काही दिवसांनी गावातील विहिरी व इतर जलस्रोत यांची भुजल पातळी खाली जाऊन गावातील शेतकऱ्यांचे फार मोठे हाल होतील. तसेच शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात अडचणीत येईल. त्यामुळे २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातील प्लॉटिंगवाले तसेच डेव्हलपर्स घेत असलेले बोअरवेल बंद करण्याचे ठरले.

 

तसेच यापुढे कोणीही बोअरवेल घेवू नये असे आव्हानही ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आले आणि तसा ठरावही संमत करण्यात आला. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्ष म्हणुन बाभुळसर खुर्द गावच्या सरपंच सोनाली दशरथ फंड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर; उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये घेऊन फसवणुक