मुख्य बातम्या

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना “सायबर क्राईम” चा धोका वाढतोय

शिरुर (तेजस फडके) सध्या आपल्या देशात नवनवीन डिजिटल तंत्रज्ञान विकसित होत असुन आपली वाटचाल डिजिटल इंडियाकडे चालु आहे. परंतु सध्या कोणतीही घरफोडी, दरोडा तसेच लूटमार न करता लोकांच्या बँक अकाउंट मधुन पैसे गायब करणारी “सायबर क्राईम” ची नवीन पद्धत अस्तित्वात आली असुन डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अशिक्षित लोकांसोबत उच्चशिक्षित लोकांनाही पद्धतशीरपणे “गंडा” घालणारे सायबर गुन्हेगार वाढत असुन शिरुर तालुक्यातील शिक्रापुर, रांजणगाव MIDC आणि शिरुर पोलिस ठाण्यात याबाबत अनेक गुन्हे दाखल झाले असुन त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

फेसबुक, व्हाट्स अँप या सोशल मीडिया साईटवर काही व्यक्तींना तुम्हाला लॉटरी लागली असे सांगत ऑनलाईन मेसेजची लिंक पाठवली जाते. जर चुकूनही त्या व्यक्तीने त्या लिंकवर क्लिक केलं. तर त्याच्या अकाऊंटचे डिटेल्स विचारून त्याला मोबाईलवर आलेला OTP विचारला जातो आणि जर त्या व्यक्तीने तो OTP समोरच्याला दिला तर त्याचे बँक अकाउंट हँक करुन त्याच्यातली संपुर्ण रक्कम काढली जाते. तसेच व्हाट्स अँप वर अश्लील व्हिडिओ चॅटींग करत एखाद्या व्यक्तीला बदनामीची धमकी देत ब्लॅकमेल करुन पैसे उकळले जातात. असे प्रकार सर्रास घडतं असुन समाज्यात बदनामी होईल या भीतीने फसवणूक झालेल्या व्यक्ती पोलिसांकडे जाण्याचं टाळतात.

तसेच काही व्यक्तींना लोन अँप वरुन लोन देऊन नंतर त्याला सतत अश्लील शिव्यांची लाखोली वाहून “तू लोन भर नाहीतर आम्ही तुझे फोटो मॉर्फ करून तुला बदनाम करू, तू रेपिस्ट आहेस असे तुझ्याबद्दल व्हायरल करु, तुझे आयुष्य उध्वस्त करू” असे धमकीचे फोन आणि मेसेज यायला सुरुवात होते. त्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना त्याच्याबद्दल अश्लील फोन, मेसेज आणि मॉर्फ केलेले व्हिडीओ गुन्हेगार पाठवत असतात. शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना अनेक घडल्या असून अशावेळी घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

सायबर क्राईमद्वारे फसवणूक झाल्यास फॉलो करायच्या काही महत्वाच्या गोष्टी 

1) ज्यावेळी कोणतीही गोष्ट फुकट मिळते तेव्हा काहीतरी गडबड आहे हे समजून घ्यावे. (उदा. पैसे, वेगवेगळे ऍप्स, गेम्स खेळून मिळणारी गिफ्ट्स वगैरे..)

2) प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केलेल्या ऍपमध्ये Allow चे बटण दाबून आपण आपली सगळी माहिती चोरांच्या डायरेक्ट हातात देत असतो हे लक्षात ठेवावे.

3) कोणताही OTP, आपली कसलीही खासगी माहिती कोणत्याही भूल थापेला बळी पडून कोणाशीही शेअर करू नये.

4) चुकून आपल्या बाबतीत एखादा फ्रॉड झालाच तर अशा केस मध्ये हे गुन्हेगार आपल्याला बदनाम करण्यासाठी आपले फोटो मॉर्फ करण्याच्या धमक्या देतात.

5) परंतु बरेचवेळा लोक काहीही केलेले नसताना आपली खोटी बदनामी होईल की काय याला घाबरून फ्रॉड लोकांना पैसे पाठवत राहतात व त्यातून पुढे अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये अडकतात आणि यातूनच आत्महत्या देखील घडतात तरी कृपया अशावेळी असे न करता आपण खंबीरपणे या परिस्थितीला तोंड देणे गरजेचे असते.

6) क्षणाचाही विलंब न करता पोलिसांची मदत घेणे अत्यावश्यक असते.अशा धमकीच्या फोन कॉल्सला एनटरटेन न करता तो नंबर डायरीमध्ये नोंद करून रिपोर्ट करून ब्लॉक करावा.

7) ही सगळी माहिती पोलिसांना कळवावी तसेच घरातल्या जेष्ठ व्यक्तींना आणि लहान मुलांनासुद्धा सायबर फ्रॉडबाबत जागरूक केले पाहिजे.

8) आपले ऑफिसेस, सोसायट्या, जेष्ठ नागरिक संघ आदी ठिकाणी पोलिसांना बोलावून त्यांच्याकडून सायबर फ्रॉडबाबत माहिती घ्यावी. तसेच कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता खंबीर राहून पोलिसांची मदत घ्यावी.

सोशल मीडियावर आलेल्या अशा संशयास्पद लिंक वर शक्यतो क्लिक करू नये ,चुकून अशी लिंक क्लिक झालीच तर आपल्या फोन मधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्टला त्या बद्दल माहिती देऊन कोणी पैशाची मागणी केली तर काहीही मदत करू नये. तसेच रिझर्व्ह बँकेच्या नियमावली न मानणाऱ्या संस्थांकडून कर्ज स्वरूपात रक्कम घेऊ नये. आणि फसवणूक झाली तर जवळच्या पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार द्यावी.

सुरेशकुमार राऊत

पोलीस निरीक्षक, शिरुर

 

 

 

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

13 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

17 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

18 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

18 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

18 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

20 तास ago