मुख्य बातम्या

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथे दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि. आय. रोड लगतच्या कारेश्वर इंग्लीश मिडीयम शाळेसमोर अज्ञात व्यक्तींनी चार-पाच मोटार सायकलची दगडाने तोडफोड करत एक मोटार सायकल पेटवून दिली होती. तसेच हातात लाकडी दांडके आणि कोयता घेवुन दहशत माजविली होती. याप्रकरणी आठ जणांवर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सहा आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि. आय. रोड लगतच्या कारेश्वर इंग्लीश मिडीयम शाळेसमोर अज्ञात व्यक्तींनी चार-पाच दुचाकी मोटार सायकलची दगडाने तोडफोड करत त्यातील एक मोटार सायकल पेटवून दिल्याची माहिती रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली त्यानंतर वाघमोडे यांनी पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफसह घटनास्थळी तात्काळ जावुन घटनास्थळावरील पेटलेली मोटार सायकल विझविली.

 

सदर ठिकाणी जमलेल्या गर्दीतील लोकांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे घडलेल्या प्रकाराबाबत आनंद लक्ष्मण खाडे (वय 19) रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे याच्या फिर्यादीवरुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील फिर्यादी व त्याचा मित्र अक्षय कुटे यांना किरकोळ कारणावरुन रणजीत शितोळे, तेजस शितोळे, धनंजय शिरफुले, रोहन बोटे, शंकर करंजकर व इतर तीन जणांनी बेकायदेशीर जमाव जमवुन जबरदस्तीने त्यांच्याकडील रिक्षा मध्ये बसवुन रांजणगाव MIDC मधील आय टि आय (ITI) रोडलगतच्या कारेश्वर इंग्लीश मिडीयम स्कुल समोरील कंपनी जवळ नेवुन त्यांना हाताने, लाकडी दांड्याने मारहाण केली.

 

तसेच त्या ठिकाणी लावलेल्या पाच मोटार सायकलची दगडाने तोडफोड करुन एक मोटार सायकल पेटवुन देवुन मोटार सायकलचे नुकसान केले आहे. सदर प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे बेकायदा गर्दी जमाव जमवुन दहशत निर्माण केल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयातील आरोपीचे नाव व पत्ता निष्पन्न करुन त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलीसस्टेशन कडील तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांना सुचना देवुन आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले.

 

या तपास पथकाने सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी 1) रणजित गंगाराम शितोळे (वय 34), 2) धनंजय सतीष शिरफुले (वय 20), 3) तेजस अनिल शितोळे (वय 21), 4) शंकर जालींदर करंजकर (वय 19), 5) गिरीष गोविंद कराळे (वय 19), 6) प्रेमराज मधुकर वाघमारे (वय 19) सर्व रा. कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे यांना गुन्ह्याच्या तपास कामी अटक केली. त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता दि 1 जुन 2024 पर्यंत आरोपीना पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये असलेल्या दोन विधिसंघर्षीत बालकांचे नाव, पत्ता निष्पन्न करण्यात आला आहे.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, बजरंग झेंडे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार ब्रम्हा पोवार, विलास आंबेकर, पोलिस नाईक माणिक काळकुटे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करत आहेत.

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Video; ससुनच्या डॉ अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिल्याचा शिरुरच्या मुलानी-शेख कुटुंबाचा गंभीर आरोप

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17…

2 तास ago

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; लवकरच दिलासादायक निर्णय होणार

मुंबई: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील…

2 तास ago

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी…

14 तास ago

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

18 तास ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

19 तास ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

19 तास ago