Shirur Police Station
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने सुरु असून या वर्षभरात तब्बल ३५०च्या वर विद्युत रोहित चोरीला गेले आहे. या आठवड्यात तब्बल १० विदयुत रोहीत्र चोरीला गेले असल्याची माहीती शिरुर महावितरणचे विद्युत उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी दिली. महावितरणचे व शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कवठे येमाई व निमोणे (ता. शिरूर) येथील परीसरातील २९ मे रोजी विद्युत रोहीत्र चोरीला गेले आहे. निमोणे येथे एकाच रात्री तब्बल ५ विदयुत चोरीला गेले आहे. विद्युत रोहीत्रांच्या चोऱ्या थांबण्याऐवजी दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढतच चालल्या आहेत. या विद्युत रोहित्र चोऱ्यांचा तपास अद्यापही लागला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीक प्रश्नचिन्ह ऊमटू लागले आहे. वारंवार विद्युत रोहीत्र चोऱ्या होत असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
शिरूर तालुक्यात चोरटयांनी जवळपास तीनशे विद्युत रोहीत्र चोरून महावितरण विभागाचे कोटयावधी रुपयांचे नुकसान केले आहे. ऐन ऊन्हाळ्यात शेतकऱ्यांना वेळेवर विद्युत रोहित्र मिळत नसल्याने कॅनाल, नदीद्वारे पाणी आलेले असतानाही शेतीला पाणी देता येत नसल्याने डोळ्यादेखत कडक ऊन्हामुळे ऊस, मका, व इतर तरकारी पिके आदी शेतीमाल होरपळून जात असल्याने ‘धरण ऊशाला अन् कोरड घशाला’ अशी उपलब्धते अवस्था शेतकऱ्यांची झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
विद्युत रोहीत्र चोरीला गेल्यावर महिनोन महीने ते मिळत नाही. यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला असून या चोरट्यांचा कडक बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी आता कडक पावले ऊचलली पाहीजे. असा सुर नागरीकांमधून उमटत आहे.
शिरूर तालुक्यात ऐवढे चोरीला गेलेले विद्युत रोहीत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून दयायचे कसे हा मोठा प्रश्न महावितरण पुढे निर्माण झाला असून उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांना ते देण्यात येतील.
– सुमित जाधव, विद्युत उपकार्यकारी अभियंता.
कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?
रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…