Leader
पाबळ (सुनिल जिते) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चिती झाल्याने तयारी सुरु झाली असून, राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य बनण्याची स्वप्न उराशी बाळगून असलेल्या इच्छुक आपापल्या गट व गणात मोर्चे बांधणी करत आहेत. नेत्यांच्या निवडणुकीकरिता युती आघाडीचा फार्मूला अवलंबला जातो. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याची संकेत दिले जात आहेत. जिल्हा परिषद गटाचे आरक्षणही स्पष्ट झाले असून, संभाव्य उमेदवार मतदार संघ आपल्याच वाट्याला अपेक्षेने मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपासह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजितदादा गट) महत्त्वाची भूमिका या निवडणुकीत राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत. या बैठकीतून पक्षाची भूमिका, निवडणुकीची रणनीती संभाव्य उमेदवारांच्या नावावर चाचणी आदी बाबीवर चर्चा वरिष्ठ नेते करित आहेत.
कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या आहेत. आपली सत्ता यावी म्हणून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिरूर तालुक्यात विविध समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. प्रत्येक गावच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून, वीज पुरवठा खंडित राहतो. जलजीवन योजनाही अपूर्ण अवस्थेत असल्याने पाण्यासाठीही नागरिकांना धावाधाव करावी लागते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. यावर कोणताही पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…