मुख्य बातम्या

तर बापुसाहेब शिंदे भविष्यात शिरुरचे आमदारही होऊ शकतात; आमदार शरद सोनवणे यांचं भाकीत

कारेगाव (तेजस फडके) ‘बापुसाहेब तुमचं काम चालु ठेवा. गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही कायमच पुढाकार घेत असता. भविष्यात तुम्ही शिवसेनेचे शिरुर तालुक्यातीलच नव्हे महाराष्ट्राचे मोठे नेते असाल. तसेच सन २०२९ मध्ये पक्षाने आणि जनतेने संधी दिली तर कदाचित तुम्ही शिरुरचे आमदारही होऊ शकता असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले.

 

पुढे बोलताना आमदार सोनवणे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासुन बापुसाहेब शिंदे यांना मी ओळखतो. माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा तुमच्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु त्यांना कामाच्या व्यापातुन शक्य झालं नाही. परंतु भविष्यात एकनाथ शिंदे रांजणगावला नक्की येतील असेही आमदार सोनवणे म्हणाले.

 

शिवसेना युवा पुणे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी दि १ ऑगस्ट २०२४ ते दि ५ ऑगस्ट २०२४ दरम्यान शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना रेशनकार्ड सहजासहजी उपलब्ध व्हावेत यासाठी एक मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर शिरुर तालुक्यातील अनेक गावातील लोकांची रेशनकार्डबाबतच्या कागदपत्राची पुर्तता करण्यात आली.

 

त्यानंतर रांजणगाव गणपती येथील मातोश्री भवनच्या कार्यालयात शनिवार दि ५ एप्रिल २०२५ रोजी शिवसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते ११०० रेशनकार्ड धारकांना या रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या विक्रम पाचुंदकर, संदीप कुटे, वैभव खेडकर, विलास बत्ते, आत्माराम खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी शिरुर तालुक्यातील शिक्रापुर, सणसवाडी, कोंढापुरी, रांजणगाव गणपती, सोनेसांगवी, ढोकसांगवी, करंजावने, भांबर्डे, टाकळी हाजी, केंदुर, न्हावरे, पिंपरखेड, मोराची चिंचोली, बाभुळसर, खंडाळे, गणेगाव खालसा, पिंपरी दुमाला, निमगाव म्हाळुंगी तसेच अनेक गावातील सर्वसामान्य रेशनकार्ड धारक उपस्थित होते.

 

यावेळी शिवसेना युवा पुणे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, शिवसेना महिला आघाडी शिरुर लोकसभा मतदार संघाच्या संपर्कप्रमुख सारीका पवार, मराठा महासंघाच्या जिल्हा संपर्कप्रमुख सुरेखा निघोट, माजी पंचायत सदस्य विक्रम पाचुंदकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आण्णा हजारे, रांजणगावच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा वायदंडे, ग्रामपंचायत सदस्या अर्चना शिंदे, ग्रामपंचायत सदस्य निलेश लांडे, नेताजी फंड, राहुल पवार, आत्माराम खेडकर, सोनेसांगवीच्या लोकनियुक्त सरपंच रेखा काळे, , युवासेना जिल्हा संघटक वैभव खेडकर, युवासेना जिल्हा चिटणीस वैभव ढोकले, विष्णु साळुंखेआदी मान्यवर उपस्थित होते.

रांजणगाव गणपती निवडणुक निकालानंतर बापूसाहेब शिंदे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला’; त्या बॅनरची रांजणगाव गणपती सह पंचंक्रोशीत चर्चा

लेक चेअरमन झाला पण खुर्चीत बसायचा मान मात्र आईला दिला

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

6 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

6 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

6 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

6 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

6 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

20 तास ago