रांजणगाव गणपती निवडणुक निकालानंतर बापूसाहेब शिंदे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

मुख्य बातम्या राजकीय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) तीन दिग्गज विरोधक एकत्र आले आणि त्यांनी प्रशासनावर दबाव टाकत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या पॅनलचे उमेदवार राहुल पवार यांना तडीपार करण्यासाठी मानसिंग पाचुंदकर यांने राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु परंतु शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हि गोष्ट घातली. त्यामुळे आपल्याला आढळराव दादांची मोठी मदत मिळाली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मानसिंग हा जाणीवपूर्वक राजकीय ताकतीचा गैरवापर करत असल्याचे दिसून आले. मानसिंग हा विषारी नाग असल्याची जहरी टिका शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापुसाहेब शिंदे यांनी केली.

यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आपल्या पॅनलचा जरी आज पराभव झाला असला. तरी सर्वांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केल. त्यामुळे पराभवाने खचून न जाता. यापुढील प्रत्येक निवडणुकीत आपण एकदिलाने काम करु अजुन जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ अशा अनेक निवडणुका बाकी असुन जिल्हा परिषद निवडणुकीत मानसिंगचे अनेक सातबारे बाहेर काढणार असल्याचेही ते बोलले. तसेच रांजणगाव मधील तीन दिग्गज नेत्यांना जिल्हा परिषद गटातील जनता धूळ चारल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

राहुल पवार यांना निवडणुकीच्या आधी तडीपार करण्याची विरोधकांनी पुर्ण तयारी केली होती. परंतु शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला मोठी मदत केली. त्यामुळे राहुल पवार यांना तडीपार होण्यापासुन आपण वाचवू शकलो. या निवडणुकीत विरोधकांनी साम, दाम, दंड, भेद याचा वापर करुन हि निवडणुक जिंकली.

 

तसेच मानसिंग पाचुंदकर आणि भिमाजी खेडकर हे दोघेही दिग्गज सहा नंबर वार्डात राहत असुन माझं किंवा माझ्या कुटुंबापैकी कोनाचही मतदान सहा नंबर वार्डात नसताना मी माझ्या पत्नीला त्या वार्डात उमेदवार म्हणुन उभ केल. परंतु मतदारांनी साथ दिल्याने हा विजय झाला. पराभूत झालेल्या उमेदवारांचा अगदी थोडया मताने पराभव झाला आहे. आपले तीन सदस्य जरी आले असतील तरी भविष्यातल्या निवडणूकीत आपल्याला अजुन जोमाने तयारी करायची आहे असेही बापुसाहेब शिंदे यांनी सांगितले.