मुख्य बातम्या

शिरसगाव काटा येथे घरफोडी; सुमारे २ लाख २० हजारांचे दागिने चोरीला…

न्हावरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा गावात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बाबुराव म्हाता गोरे (वय ३६, शिरसगाव काटा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिल्याने या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते दि ५ ऑगस्ट रोजी १:३० च्या दरम्यान, त्यांच्या राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन दोन पत्र्याच्या पेट्यांमधील २ तोळे ५ ग्रॅमचे अंदाजे १ लाख रुपये किंमतीचे डोरले तर ३ तोळे वजनाच्या अंदाजे १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या पुतळ्या असे एकुण २ लाख २० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहेत.

रांजणगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एक आरोपी अटक

महसूल सप्ताह अंतर्गत रांजणगाव गणपती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

शिक्रापुर मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला चार जणांकडुन बेदम मारहाण

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

1 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

1 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

1 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago