शिक्रापुर मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला चार जणांकडुन बेदम मारहाण

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर गावच्या हद्दीत संजीवनी हॉस्पिटलसमोर एक १७ वर्षीय विद्यार्थी आपल्या मित्रासह चहा पिण्यासाठी जात असताना दि ४ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १२:१५ च्या सुमारास त्याला चार जणांनी अडवुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत जखमी युवक स्वप्नील सतीश कोठारी (वय १७, रा. भुजबळ मळा, शिक्रापुर, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. तागडगाव, ता. शिरुर कासार, जि. बीड) याने शिक्रापुर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार त्याला आणि त्याचा मित्र गोविंदला एक पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपी अमोल खेडकर, कुणाल राऊत व दोन अनोळखी व्यक्ती अशा चार जणांनी अडवून विनाकारण शिवीगाळ व दमदाटी करत, हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी लाकडी काठी व हातातील स्टीलच्या कड्याने स्वप्नीलच्या डोक्याला व पाठीवर वार करत गंभीर दुखापत केली. तसेच, “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली. या प्रकरणातील दोन आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.

रांजणगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एक आरोपी अटक

करडे येथे अष्टविनायक महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू

महसूल सप्ताह अंतर्गत रांजणगाव गणपती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न