रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळवणाऱ्या अड्ड्यावर २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला रंगेहात पकडले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल उमेश महादेव कुतवळ यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. सागर खंडू जाधव (वय ३०, रा. रांजणगाव, ता. शिरुर) या व्यक्ती विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर जाधव हा रांजणगाव गणपती येथे पाण्याच्या टाकीजवळ ‘चिमणी पाखरे’ नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारवाईदरम्यान काही मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिस हवालदार नितीन भोस यांनी प्राथमिक कारवाई केली असून, या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे हे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैध जुगार खेळांवर पोलिसांनी नियंत्रण मिळवल्याचे चित्र दिसत असून, रांजणगाव पोलिसांचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.
करडे येथे अष्टविनायक महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू
शिरुर मध्ये भर दुपारी ६५ वर्षीय जेष्ठ महिलेला लुटले ९० हजारांचे मंगळसुत्र चोरीला
शिक्रापुर येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करत लिफ्टमध्ये जाणाऱ्या महिलेला लुटले