मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल; पोलिसांनी केली एका महिलेची सुटका

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकात एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये वेश्याव्यवसाय चालु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार दर्शन दुगड (I.P.S) यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलावुन घेत येथील वेश्याव्यवसायावर कारवाई केली असुन यात एका 40 वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली असुन तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी चार्ज घेतल्यानंतर पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उचलला असुन त्यासाठी त्यांनी स्वतंत्र पथके तयार केलेली आहेत. त्या पथकातील दर्शन दुगड (I.P.S) हे साध्या वेषामध्ये पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल तसेच लॉजेस मध्ये चालणा-या अवैध धंद्यांबाबत माहिती काढत असतांना त्यांना दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील हॉटेल गुरुदत्त वडेवाले पासुन आतमध्ये जाणाऱ्या रोडलगतच्या एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये वेश्याव्यवसाय चालु असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली होती.

 

त्यानुसार दर्शन दुगड (I.P.S) यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलावुन घेतले. तसेच त्यांच्यासोबतचे पथकातील शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलिस हवालदार विनायक मोहिते, परशुराम म्हस्के, दिनेश कुंभार व महिला पोलीस कॉन्स्टेबल आर बी टोपे यांची दोन वेगवेगळी पथके तयार केली होती.

 

त्यानंतर वेश्याव्यवसाय चालणाऱ्या इमारतीजवळ खाजगी वाहनामधुन येवुन सदर ठिकाणी सदर ठिकाणी छापा कारवाई करीता एक बनावट ग्राहक तयार करुन त्यास त्या इमारतीत पाठवले होते. सदर ठिकाणी अवैधरीत्या वेश्याव्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्यावर दर्शन दुगड (I.P.S) यांचे पथक व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे पथक अशा दोन्ही पथकांनी सदर ठिकाणी खाजगी वाहनातुन जावुन रात्री 11 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे.

 

या कारवाई मध्ये उडीसा राज्यातील एक 40 वर्षीय महिला मिळुन आली असुन तिच्या असहाय्यतेच्या फायदा घेवुन तिला अवैधरीत्या देहविक्री करत असताना आरोपी 1) अर्जुन रामसमुझ वर्मा (वय 24), सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. पुरेफेरी, सराया महेशा, तिलोई, जि. रायबरेली, उत्तरप्रदेश), 2) मंगलसिंग संतोषसिंग गेहलोत (वय 33) सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि.पुणे. मुळ (रा. शिवनी खदान, ता.जि.अकोला), 3) बबलु दुखबंधु साहु (वय 40) सध्या रा. कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे. मुळ (रा. तालचर, ता.जि. डेकालाल, उडीसा) हे आरोपी मिळून आले असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रांजणगाव MIDC पोलीसांनी सदर आरोपीना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल तसेच इतर वस्तु असा एकुण 31 हजार 410 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीना दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात आलेली असुन त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपीना दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तसेच  गुन्ह्यातील पिडीत महिलेस कोर्टाच्या आदेशाने रेस्क्यु फॉऊंडेशन, पुणे येथे समुपदेशन करणे कामी पाठविण्यात आले आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन दुगड (I.P.S), पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलिस हवालदार विनायक मोहिते, परशुराम म्हस्के, दिनेश कुंभार व महिला पोलीस कॉन्स्टेबल आर बी टोपे, रांजणगाव MIDC चे सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, माऊली शिंदे, वैजनाथ नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल शुभम मुत्याळ यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे करत आहेत.

 

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच रांजणगाव औद्योगिक परीसरामध्ये अशा प्रकारे कोणी अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना जागा तसेच घर भाड्याने देईल अशा जागा व घर मालकांना देखील गुन्हयामध्ये आरोपी करण्यात येईल. तसेच नागरीकांना कोणी माथाडी, प्लेसमेंटच्या नावाखाली पैशांची मागणी करुन फसवणुक, खंडणीची मागणी करत असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.

महादेव वाघमोडे (पोलिस निरीक्षक)

 रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात…? पोलिस ‘सिंघमगिरी’ दाखवणार का…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…

11 तास ago

शिंदेंची ताकद वाढली, ठाकरेंपुढे नवे राजकीय आव्हान

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…

11 तास ago

शिरूर! आमदाबादच्या युवकाने 27व्या वाढदिवसानिमित्त केली 27 वृक्षांची लागवड…

शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा…

11 तास ago

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवली; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २…

11 तास ago

निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम; दोषींना ब्लॅकलिस्ट करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे…

12 तास ago

शिरूर तालुक्यातील आरोपींचा दीड किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन…

12 तास ago