मुख्य बातम्या

Video; ठेकेदाराचा अजब कारभार; भर पाऊसात करडे-कारेगाव रस्त्याची डागडुजी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) करडे-कारेगाव रस्त्याचे गेल्या सहा महिन्यांपुर्वी काम झाले होते. परंतु सहा महिन्यानंतर हा रस्ता उखडन्यास सुरुवात झाली असुन ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. आज (दि २९) रोजी दिवसभर पाऊस चालु होता. त्या भर पाऊसात ठेकेदाराने रस्त्याची डागडुजी चालु केली असल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त करत एवढया दिवस ठेकेदार काय झोपा काढत होता का…? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

करडे-कारेगाव रस्ता हा रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामाला येणाऱ्या कामगारांसाठी महत्वाचा मार्ग आहे. गेल्या सहा महिन्यापुर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. परंतु ठेकेदाराने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याने सहा महिन्यातच हा रस्ता उखडला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याचा दर्जा नक्की तपासतात की फक्त कार्यालयात बसुन राहतात हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे साटलोट…? 

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे झाली आहेत तर काही ठिकाणी चालु आहेत. परंतु या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारा मुरुम, खडी, डांबर यांचा दर्जा मात्र निकृष्ट आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते सहा महिन्याच्या आतच उखडले आहेत. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करुनही अधिकारी त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याने रस्त्याचे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्यात काहीतरी साटलोट तर नाही ना…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

(क्रमशः) 

शिरुरमध्ये भरधाव टेम्पोने शेतकऱ्याला उडवले; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?

रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन;पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

8 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago