मुख्य बातम्या

शिरुरमध्ये भरधाव टेम्पोने शेतकऱ्याला उडवले; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे (कुऱ्हाडवाडी) येथील रहिवासी शेतकरी हनुमंत साधु गरदडे (वय ३३) यांना भरधाव टेम्पोने धडक देऊन गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी टेम्पो क्रमांक एमएच १६ सीडी ८०८९ वरील अज्ञात चालकाविरुद्ध शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही घटना दिनांक १८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६:३० च्या दरम्यान शिरुर गावच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर रोडवर जान्हवी हॉटेलजवळील गोलेगाव पुलाजवळ घडली. फिर्यादी हनुमंत गरदडे हे रस्त्याच्या कडेला थांबलेले असताना, एक चॉकलेटी रंगाचा टेम्पो विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येऊन अचानक नगरकडे वळला याच टेम्पोने गरदडे यांना जोराची धडक दिली.

 

हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचे चाक फिर्यादीच्या डाव्या पायावरुन गेल्यामुळे मांडीला व तळपायास गंभीर स्वरुपाचे फ्रॅक्चर झाले. मात्र धडक दिल्यानंतर चालकाने फिर्यादीला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याऐवजी घटनास्थळावरुन पळ काढला.

 

त्यानंतर फिर्यादी हे जवळपास महिनाभर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामुळे दि २८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार विशाल कोथळकर हे करत आहेत.

रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?

रांजणगाव MIDC त दिवसाढवळ्या ऑफिसमधुन ९० हजार रुपयांची टूल्सबॅगची चोरी

रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन; पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

11 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

11 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

11 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

15 तास ago