मुख्य बातम्या

Video; प्लॉटिंगसाठी जीव धोक्यात घालुन २२ के व्ही लाईटच्या पोलवर जाहिरातबाजी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात प्लॉटिंगचे प्रमाण वाढले असुन प्लॉटिंगच्या जाहिरातीसाठी भर पाऊसात २२ के व्ही विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या विजेच्या खांबाला लोखंडी शिडीचा वापर करत ‘वृंदावन सिटी’ या प्लॉटिंगच्या जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यासाठी जीव धोक्यात घालत दोन कामगारांनी फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार करडे-कारेगाव रस्त्यावर आज (दि २९) रोजी दुपारी २:३० च्या सुमारास घडला.

विशेष म्हणजे यावेळी प्लॉटिंगच्या मालकाचा एक नातेवाईक चारचाकी गाडीत बसुन हा सर्व प्रकार पहात होता. भर पाऊसात दोन कामगार प्लॉटिंगच्या जाहिरातीचा फ्लेक्स घेऊन विजेच्या खांबाला लोखंडी शिडी लाऊन फ्लेस लावत होते. परंतु जर फ्लेस लावत असताना चुकून जर काही अनुचित प्रकार घडला असता. तर त्याची जबाबदारी नक्की कोणाची असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.

सध्या रांजणगाव ते बाभुळसर अष्टविनायक महामार्ग, कारेगाव-करडे रस्ता, तसेच रांजणगाव गणपती ते सोनेसांगवी अष्टविनायक महामार्ग या रस्त्यावर दिवसेंदिवस प्लॉटिंगचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्यावर असणाऱ्या अनेक झाडांवर खिळे ठोकून प्लॉटिंगची जाहिरातबाजी केली जाते. तसेच लाईटचे खांब आणि मिळेल तिथे प्लॉटिंगच्या जाहिरातीचे फ्लेस लावले जातात. त्यामुळे निसर्गाची हानी तसेच विद्रुपीकरण होत आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सुद्धा अनेक झाडांवर खिळे ठोकून अनेक प्रकारची जाहिरातबाजी केली जाते. तसेच अनेक लघु आणि उच्चदाब विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या लाईटच्या खांबालासुद्धा फ्लेक्स लावण्यात येतात. परंतु लाईटकच्या खांबाला फ्लेक्स लावताना जर काही अनुचित प्रकार घडून एखाद्याचा जीव गेला तर त्याला कोण जबाबदार हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

 

महावितरणचे अधिकारी कारवाई करणार का…?

करडे-कारेगाव रस्त्यावर २२ के व्ही विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या विजेच्या खांबाला लोखंडी शिडीचा वापर करत प्लॉटिंगच्या जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यासाठी दोन कामगारांनी भर पाऊसात जीव धोक्यात घातला. याबाबत प्लॉटिंगचे काम पाहणारे अजिंक्य भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता. ‘आम्ही प्लॉटिंगचे फ्लेक्स ज्यांना बनवायला दिलेत त्यांनाच ते लावण्याचे काम दिलेले आहे’ असे सांगितले. त्यामुळे आता कामगारांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर महावितरणचे अधिकारी कारवाई करणार का…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

(क्रमशः) 

Video; ठेकेदाराचा अजब कारभार; भर पाऊसात करडे-कारेगाव रस्त्याची डागडुजी…?

रांजणगाव MIDC त दिवसाढवळ्या ऑफिसमधुन ९० हजार रुपयांची टूल्सबॅगची चोरी

Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

रांजणगावच्या ४० वर्षीय तरुणाने तब्बल ६१ किमी अंतर कापत एकाच दिवसात केल्या चार द्वारयात्रा

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

2 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

10 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

10 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

10 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

10 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

11 तास ago