मुख्य बातम्या

कोंढण ओढा पुलावर धोका कायम; दुरुस्तीच्या प्रतीक्षेत शिरूर-पाबळ रस्ता

सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार, सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर ते कोंढणओढ्यापर्यंत शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीमिश्रित मुरूम टाकून फक्त तात्पुरती मलमपट्टी केली असून आस्थाव्यस्थ पसरलेल्या मुरमामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तसेच शिरूर–पाबळ रस्त्यावरील कोंढण ओढ्याच्या पूलावरील रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असूनही संपुर्ण दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी आजवर मुहूर्तही मिळालेला नाही, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

मुळात हा पूल प्रवाहाची दिशा बदलून चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला असल्याची तक्रार सुरुवातीपासूनच करण्यात येत होती. या गंभीर अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण करून आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, त्यानंतर दक्षता गुणनियंत्रण समितीचा अहवाल अद्यापपर्यंत उपलब्ध झाला नाही. परिणामी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

दरम्यान, पुलावरील रस्ता मोठ्या खड्ड्यांनी भरलेला असल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार होणारे अपघात, उलटणारी वाहने आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही परिस्थिती असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बेफिकीर आहे.

स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. “ते अनेकदा कार्यालयात उपस्थित नसतात, शिरूरमध्ये निवासी राहत नाहीत तसेच नागरिकांचे फोनदेखील उचलत नाहीत,” असा आरोप निलेश वाळुंज यांनी केला आहे.याबाबत त्यांनी पुढे इशारा दिला की, “जर लवकरात लवकर कोंढण ओढा पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही, तर मी पुन्हा एकदा उपोषणास बसणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago