मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील अनाधिकृत सेंट चावरा स्कूलवर कारवाई करण्याची मागणी

शासन निर्णयाची पायमल्ली, पालकांची फसवणूक, शिक्षण विभागाची डोळेझाक

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसताना गेली सात – आठ वर्षे सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मुलांचे अतोनात नुकसान होणार आहे.शासन निर्णयानुसार, शाळांना परवानगी मिळालेल्या माध्यमात बदल करता येत नाही. धक्कादायक म्हणजे या संस्थेने मराठी माध्यमाची परवानगी घेऊन इंग्रजी माध्यमातील वर्ग नियमबाह्य रीत्या सुरू केले आहेत. या प्रकारामुळे शासन निर्णयाची पायमल्ली झाली असून, पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शाळेला यू – डायस क्रमांकच नाही. अंतिम मान्यता नाही. यामुळे शालेय संहिता नियमावली १९८१ चा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे सदर संस्थेवर शिक्षण विभागाने कारवाई करण्याची मागणी शिरुर शहरातील नागरीकांकडून होत आहे.

मराठी भाषेचा अपमान, तीव्र आंदोलनाचा इशारा….

मराठी राज्यात मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा हा प्रकार असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मराठी माध्यमाची परवानगी असतानाही इंग्रजी माध्यम चालवणे हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड, मनसेचे शिरूर सचिव रवि लेंडे दिला आहे.

अनधिकृतपणे बिनधास्तपणे सुरू असलेली ही इंग्रजी माध्यमाची शाळा शासन निर्णयाचा भंग, परवानगी नसताना शाळा चालू असून शिक्षण विभाग नक्की काय करतय असा सवाल उपस्थित होत आहे. या शाळेला एका बड्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहीती समोर येत असून त्यामुळे शिक्षण विभाग कारवाई करायला धजावत नसल्याचे चित्र समोर येत आहे.

(क्रमशः)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

16 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

20 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

20 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

20 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

20 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

20 तास ago