सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांची तातडीने उपाययोजनांची मागणी
शिरूर (अरुणकुमार मोटे): सर्वसामान्य ग्रामीण जनतेच्या आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू असलेल्या शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेमण्यात आलेल्या दंतचिकित्सकांना आवश्यक उपचार साधनसामग्री उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरळीतपणे सुरू करता येत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. ही बाब समजल्यानंतर याची गंभीर दखल घेत “सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल ब्लोअर निलेश मंंदा यशवंत वाळुंज” यांनी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय शिरूर यांना निवेदनाद्वारे ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.
दंतचिकित्सक उपलब्ध असतानाही साधनसामग्रीवीणा रुग्णसेवा ठप्प होणे ही केवळ यंत्रणांची अकार्यक्षमता नाही, तर ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर अन्याय आहे. या पार्श्वभूमीवर, वाळुंज यांनी अत्यंत सौम्य पण ठाम शब्दांत प्रशासनास विनंती केली आहे की, रुग्णहितासाठी सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य व वेळेवर उपचार मिळू शकतील आणि गरजूंचे आर्थिक नुकसान टाळता येईल.
ही मागणी केवळ सामाजिक जबाबदारी व लोककल्याणाच्या भावनेतून करण्यात आलेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे यांना सुद्धा या निवेदनाची प्रत ईमेल द्वारे देण्यात आलेली आहे, यंत्रणांनी समन्वय साधावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीत ग्रामीण आरोग्यव्यवस्थेच्या मजबुतीसाठी अशा सकारात्मक आणि बांधिलकीने केलेल्या मागण्या ही काळाची गरज आहे. प्रशासनानेही हे लक्षात घेऊन तात्काळ कृती करावी, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
निलेश मंंदा यशवंत वाळुंज
सामाजिक कार्यकर्ते / व्हिसल ब्लोअर
कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…
शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…